गुवाहाटी - यजमान भारतीय संघाने १२ व्या दक्षिण अाशियाई स्पर्धेतील साेनेरी यशाची लय कायम ठेवली. युवा खेळाडूंनी ट्रायथलॉन, नेमबाजी अाणि बाॅक्सिंगमध्ये अव्वल कामगिरी साधत भारताच्या नावे पदकांची नाेंद केली. ट्रायथलॉन प्रकारात अापला दबदबा कायम ठेवताना भारताने रविवारी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. यामध्ये भारताचे युवा खेळाडू पल्लवी रेतीवालासह दिलीप कुमार, सराेजिनी अाणि धीरज सावंत हे चमकले. त्यांनी पुरुष, महिला अाणि मिश्र गटात भारताला हे साेनेरी यश मिळवून दिले. पल्लवी व दिलीपने मिश्र गटातही साेनेरी यश संपादन केले. या दाेघांनी सराेजिनी व धीरज साेबत फायनल १ तास २४ मि. ३१ सेकंदात जिंकली.
चैनचे तिसरे सुवर्णपदक : भारताचा चैन सिंगने रविवारी स्पर्धेत तिसऱ्या सुवर्णपदकाची नाेंद केली. या युवा नेमबाजाने पुरुषांच्या ५० मीटर थ्री पाेझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकले.