आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत तिसऱ्यांदा कबड्डीचा विश्वविजेता; फायनलमध्ये इराणला ३८-२९ ने नमवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - अनुपकुमारच्या नेतृत्वाखाली यजमान भारतीय संघ शनिवारी कबड्डी स्पर्धेत विश्वविजेता ठरला. यजमानांनी तिसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकले. भारताने फायनलमध्ये इराणचा ३८-२९ ने पराभव केला. अजय ठाकूरच्या सुरेख चढाईच्या बळावर भारताने सामना जिंकला. यासह भारताला तिसऱ्यांदा जेतपेदावर नाव काेरता अाले. तसेच इराण तिसऱ्यांदा उपविजेता ठरला.

दमदार सुरुवात करतानाचा यजमान भारताचा प्रयत्न अपयशी ठरला. दाेन वेळच्या उपविजेत्या इराणने सरस खेळी करताना लढतीत अाघाडी मिळवली. हीच लय कायम ठेवताना इराणने मध्यंतरापूर्वी १८-१२ ने अाघाडी घेतली हाेती. मात्र, भारताने पुनरागमन केले. अजय ठाकूरने अाक्रमक चढाई करून लागाेपाठ गुणांची कमाई करून भारताला अाघाडी मिळवून दिली. यास संदीप, प्रदीपनेही माेलाचे याेगदान दिले.

पहिल्या हाफमध्ये अाॅल अाऊट
भारताला सुमार खेळीचा फटका बसला. प्रदीप, अजयसह अनुपला समाधानकारक खेळी करता अाली नाही. इराणने चढाई व चुरशीच्या पकडी करून अाघाडी मिळवली. इराणने पहिल्या हाफमध्ये यजमानांना अाॅल अाऊट करून अाघाडी घेतली.

पिछाडीनंतर कमबॅक
पिछाडीवर पडल्यानंतर भारताने दमदार कमबॅक केले. अजय ठाकूरने तीन गुणांची कमाई करताना पिछाडीचे अंतर कमी केले. त्याने अाक्रमक चढाई करून भारताला ३ गुण मिळवून दिले.

भारताला तिसरे जेतेपद
यजमान भारताने यंंदाही कबड्डीचा विश्वचषक नावे केला. यातूनच भारताच्या नावे अाता हे तिसरे जेतेपद ठरले. यापूर्वी भारताने २००४ अाणि २००७ चा विश्वचषक पटकावला हाेता. याच कामगिरीमुळे यजमानांना यंदाही किताबाचा प्रबळ दावेदार मानला जात हाेते. या दोन्ही स्पर्धेचे विश्वचषक यजमान भारताने मुंबईत अायाेजित स्पर्धेत जिंकले हाेते. यात यजमान भारताने बाजी मारली.

अजय ठरला हीराे
सर्वाेत्कृष्ट चढाईच्या बळावर अजय ठाकूरने भारताला राेमांचक लढतीत विजयश्री मिळवून दिली. ताे भारताच्या फायनलमधील विजयाचा हीराे ठरला. त्याने सामन्यात सर्वाधिक १२ गुणांची कमाई करताना विजयात माेलाचे याेगदान दिले. मध्यंतरानंतर त्याने चुरशीचा खेळी करून संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
इराणवर तिसऱ्यांदा मात
भारताने पुन्हा एकदा अापले वर्चस्व अबाधित ठेवताना फायनलमध्ये इराणला नमवले. गत २००७ मध्येही यजमान भारताने अंतिम सामन्यात इराणला धूळ चारली हाेती. त्या वेळी भारताने २९-१९ ने सामना जिंकला हाेता. तत्पूर्वी, भारताने २००४ च्या विश्वचषकातील फायनलमध्ये इराणचा ५५-२७ ने पराभव केला हाेता. अाता तिसऱ्यांदा भारताने इराणवर ३८-२९ ने मात केली.
बातम्या आणखी आहेत...