आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय पुरुष हॉकी संघाने पहिला सामना जिंकला; फ्रान्सवर २-० ने केली मात.

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ले टॉक्वे (फ्रान्स)- भारतीय पुरुष हॉकी संघाने युरोप दौऱ्यातील आपला पहिला सामना जिंकला आहे. भारताने फ्रान्सवर २-० ने मात केली. भारताने हे दोन्ही गोल पहिल्या हाफमध्ये केले. दुसऱ्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही. मात्र, भारताचा दबदबा कायम राहिला. आता फ्रान्स दौऱ्यावर भारताचा दुसरा आणि अखेरचा सामना बुधवारी होईल. हा सामना वेट्टिग्स स्पोर्ट्स सेंटरवर खेळवला जाणार आहे.

भारताचा मिडफिल्डर चिंगलेनसनाने १८ व्या मिनिटाला गोल करून भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघांनी पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ करताना गोलचे प्रयत्न केले. मात्र, भारताला यश मिळाल्याने फ्रान्सवर दबाव वाढला. हा दबाव अखेरपर्यंत
कायम होता. कर्णधार सरदारसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकीपटूंनी फ्रान्सला बरोबरीची संधी दिली नाही. भारताने आपली आघाडी दुसऱ्या क्वार्टरमध्ये सुद्धा कायम ठेवली. मिडफिल्डर एस. के. उथप्पा, दानिश मुज्तबा, देविंदर वाल्मीकी यांनी शानदार संतुलन ठेवताना हल्ले केले.
एस. व्ही. सुनीलने २६ व्या मिनिटाला भारतासाठी दुसरा गोल केला.