आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Won Their Match Against Italy In World Hockey League

वर्ल्ड हाॅकी लीग : इटलीला ‘शूटअाऊट’ करून महिला हॉकी टीम उपांत्य फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँटवर्प - रितू राणीच्या नेतृत्वाखाली फाॅर्मात असलेल्या भारतीय महिला हाॅकी संघाने अापल्या अागामी रिओ अाॅलिम्पिक प्रवेशाच्या अाशा कायम ठेवल्या. भारताच्या महिला संघाने गुरुवारी एफअायएचच्या वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलमधील ‘करा वा मरा’ सामन्यात राेमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली.

जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला संघाने रंगतदार सामन्यात इटलीला शूटअाऊटमध्ये ५-४ अशा फरकाने पराभूत केले. निर्धारित वेळेपर्यंत ही लढत १-१ ने बराेबरीत राहिली हाेती. त्यानंतर शूटअाऊटमध्ये भारताने सामना जिंकला.

उपांत्यपूर्व सामन्याच्या नवव्या मिनिटाला इलिसा बेट्टाने गाेल करून इटलीला १-० ने अाघाडी मिळवून दिली हाेती. स्पर्धेतील अाव्हान कायम ठेवण्यासाठी या सामन्यात भारतीय महिलांना विजय अत्यावश्यक हाेता. त्यामुळे सरस खेळी करून राणीने ३३ व्या मिनिटाला भारतीय संघाला १-१ ने बराेबरी मिळवून दिली. शेवटपर्यंत ही लढत १-१ ने बराेबरीत राहिली हाेती. त्यानंतर शूटअाऊटमध्ये राणी, सविता, वंदना कटारिया, अनुराधा, दीपिकाने सरस कामगिरी करून भारताला शूटअाऊटमध्ये विजय मिळवून दिला.

जसजितमुळे भारत विजयी
भारताने मलेशियाला ३-२ ने हरवून उपांत्य फेरी गाठली. ड्रॅग फ्लिकर जसजित सिंगने पेनॉल्टी कॉर्नरवर दोन गोल केल्याने भारताला विजय शक्य झाला. सतबीर सिंगनेही एक गोल केला. या विजयाने भारताने दोन महिन्यांपूर्वी अझलन शाह हॉकी स्पर्धेत मलेशियाकडून झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला. अाता शुक्रवारी भारताचा सामना यजमान बेेल्जियमशी हाेईल.