आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीटीएल : इंडियन एसेसची २५-१८ ने जपान वॉरियर्सवर सहज मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - गतविजेत्या इंडियन एसेसने दमदार प्रदर्शन कायम ठेवताना इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीगच्या (आयपीटीएल) दुसऱ्या सत्रात जपान वॉरियर्सला २५-१८ ने पराभूत केले. इंडियन एसेसचा आठ सामन्यांतील हा सातवा विजय ठरला. दुसरीकडे जपान वॉरियर्सचा नऊ सामन्यांतील हा आठवा पराभव आहे.

दुबईत पहिल्याच दिवशी लढतीत इंडियन एसेसने विजय मिळवताना दमदार प्रदर्शन केले. इंडियन एसेसने आपला पहिला सेट गमावला. मात्र, नंतरचे तीन सेट जिंकले.
सांतोरो ६-० ने विजयी : पुरुष लिजेंड एकेरीत फॅब्रिस सांतोरोने जबरदस्त खेळ करताना जपानच्या थॉमस एनक्विस्टला हरवले. सांतोरेने एकही गेम न गमावता २० मिनिटांत ६-० ने विजय मिळवला. पुरुष दुहेरीत इंडियन एसेसचे रोहन बोपन्ना आणि इवान डोडिग यांनी हर्बर्ट आणि लिएंडर पेसला ६-५ ने हरवले.

बोपन्ना-सानिया पराभूत
रोहन बोपन्ना आणि सानिया मिर्झाच्या इंडियन एसेसच्या जोडीला जपानची जोडी पियरे हर्बर्ट आणि कर्स्टन फ्लिपकेन्स जोडीने मिश्र दुहेरीत २६ मिनिटांत ६-४ ने मात दिली. महिला एकेरीत इंडियन एसेसच्या एग्निजस्का रदावांस्काने जबरदस्त खेळ करताना मीरजाना लुसीच बरोनीला १९ मिनिटांत ६-१ ने हरवले.
बातम्या आणखी आहेत...