आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१२ दिवसांनीही भारताची झोळी रिकामी; ९२ खेळाडू परतले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने रिओत ११९ खेळाडू पाठवले आहेत. आपल्या ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात मोठा संघ. या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या ६ पेक्षा दुप्पट पदके येतील, अशी आशा होती. मात्र, रिओच्या सुरुवातीच्या १२ दिवसांत आपल्या पदरी फक्त निराशा आली आहे. आपले ९२ खेळाडू परतले आहेत. आता केवळ २७ उरलेत. यातील १८ अॅथलिट, एक गोल्फरकडून पदकाची आशा कमीच आहे. म्हणजे फक्त ६ मल्ल आणि २ बॅडमिंटपटूच आपल्या पदकाची आशा पूर्ण करू शकतात.

अखेर रिओत आपण कुठे कमी पडलो. खेळाडूंच्या खेळात की त्यांना मिळणाऱ्या सुविधांत कमी पडलो.. आम्ही पाहणी केली तर लक्षात आले की लंडन ऑलिम्पिक २०१२ च्या तुलनेत यंदा सुविधा कैक पटींनी वाढवण्यात आल्या, तरीही दीपा कर्माकर आणि ललिता बाबर यांना सोडले तर इतर खेळाडू सर्वोत्तम कामगिरीसुद्धा करू शकले नाहीत.

४५ कोटींच्या टॉप स्किमने मदत :
क्रीडा मंत्रालयाने टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजना तयार केली. याचे बजेट ४५ कोटी रु. होते. यानुसार १०० पेक्षा अधिक खेळाडूंना ३० लाख ते १.५० कोटी रुपयांची मदत झाली. मागच्या दोन वर्षांत १०० पेक्षा अधिक खेळाडूंचे विदेशातील प्रशिक्षण आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आले.

४० % कोच विदेशी, आधीपेक्षा दुप्पट : रिओत जाणाऱ्या भारतीय संघात ४०% कोच विदेशी आहेत. चार वर्षांपूर्वी लंडनला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये विदेशी कोचची संख्या २०% कमी होती. या वेळी खेळाडूंसोबत पर्सनल कोच, फिजियो, मसाजर आणि ट्रेनरही वाढले. व्यवस्थापकीय स्टाफ कमी करण्यात आला.

१५-२० दिवस आधीच रिओत :
वातावरणाशी एकरूप होण्यासाठी भारतीय खेळाडूंना त्यांच्या स्पर्धेपेक्षा १५ ते २० दिवस आधीच रिओत पाठवण्यात आले. पूर्वी केवळ दोन, तीन दिवस आधी पाठवले जायचे. प्रथमच नॅशनल कॅम्प किंवा इतर सरावासाठी पसर्नल कोच, ट्रेनर, फिजिओ, सपोर्ट स्टाफची परवानगी देण्यात आली.

महागड्या अँटी ग्रॅव्हिटी ट्रेडमिलवर केला सराव
साईत अँटी ग्रॅव्हिटी ट्रेडमिलसारख्या आधुनिक सुविधा आहेत. मिशन आॅलिम्पिक सेल (एमओसी) या सुविधांकडे लक्ष देते. यात नॅशनल कोच, माजी ऑलिम्पिकपटू सामील आहेत. फूड सप्लिमेंटसाठी दोन वर्षांआधीपर्यंत ३०० रु. रोज मिळायचे. आता ७०० रु. रोज मिळतात.
...मात्र, कामगिरी सरासरीपेक्षा कमी
बहुतेक नेमबाज आणि तिरंदाजांचे प्रदर्शन स्वत:च्या सरासरी इतके सुद्धा झाले नाही. थाळीफेकपटू विकास गौडा, सीमा पुनियासह बहुतेक खेळाडू आपल्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा दूर राहिले. बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आपल्यापेक्षा ५६ रँक मागे असलेल्या खेळाडूकडून हरली. मागच्या चार ऑलिम्पिकमध्ये प्रथमच आपल्याला नेमबाजीत पदक मिळाले नाही.

२४ वर्षांनी रिकाम्या झोळीची भीती
भारतावर २४ वर्षांनी पुन्हा एकदा ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने परतण्याचे संकट उभे आहे. भारताने अटलांटा १९९६, सिडनी २००० आणि अथेन्स २००४ मध्ये प्रत्येकी एक पदक जिंकले होते. बीजिंगमध्ये ३, तर लंडनमध्ये ६ पदके जिंकली होती. बार्सिलोनात १९९२ मध्ये भारताला एकही पदक मिळाले नव्हते.
बातम्या आणखी आहेत...