आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Badminton Star Ashwini Ponnappa Life Facts

हिच्या Smash ला थर्र कापतात स्पर्धक, कोर्टबाहेर पडताच होते गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्वनी पुनप्पा हिने नुकताच ज्वाला गुट्टाच्या जोडीने कॅनाडा ओपन स्पर्धेचे महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बॅडमिंटन जगतातील ही जोडी चर्चेत आहे. ज्वाला तिच्या खेळाबरोबरच बिनधास्त अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. पण अश्विनी कोर्टाबाहेर पडताच जणू गायबच होते. ती सोशल साईट्सवरही आहे, पण फार क्वचितच तिचे अस्तित्व जाणवत असते. स्वतःच ट्वीट करण्यापेक्षा अधिक ती ज्वालाच्या ट्विट्सला रिट्विट करत असते.

12 व्या वर्षी बनली चॅम्पियन
अश्वनीचे वडील राष्ट्रीय हॉकीपटू होते. त्यामुळे खेळाविषयीचे प्रेम तिच्या रक्तातच आहे, असे म्हणता येईल. लहानपणापासूच ती अॅक्टीव्ह होती. वयाच्या 8 व्या वर्षापासून बॅडमिंटनचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. 12 व्या वर्षी ती ज्युनियर नॅशनल चॅम्पियन बनली होती.

स्मॅशची दहशत..
अश्वनीने 2010 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ताशी 240 किमी च्या वेगाने एक स्मॅश मारला होता. त्यावेळी तो विश्वविक्रम होता. मात्र त्यानंतर चीनच्या हुआंग सुई (ताशी 257 किमी) ने हा विक्रम मोडीत काढला होता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, पाच वर्षात अश्विनी कशी पोहोचली टॉप 20 मध्ये...