आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटनंतर सर्वात मोठी सेलिब्रिटी बनली सिंधू, 1 दिवसाला घेते सव्वा कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाअॅड शूट दरम्यान पीव्ही सिंधू... - Divya Marathi
एकाअॅड शूट दरम्यान पीव्ही सिंधू...
स्पोर्ट्स डेस्क- पी व्ही सिंधू म्हणजेच पुसरला वेंकट सिंधू आता देशाची सिल्वर क्वीन बनली आहे. सिंधूने रिओ ऑलिंपिक आणि वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिल्यांदाच सिल्वर मेडल जिंकून दिले होते. सिंधू देशातील अशी पहिली खेळाडू आहे, जिला रिझर्व पोलिस फोर्सचे ब्रॅंड अॅम्बेसडर बनवले आहे. मात्र सिंधूच्या अनेक दिवसाच्या मेहनतीचे हे फळ आहे. ब्रॅंड एंडोर्समेंटमध्ये हिट...
 
- सिंधूचा स्पोर्ट्स कंपनी बेसलाईनसोबत तीन वर्षाचा करार आहे. ही डील 50 कोटींची आहे. नॉन क्रिकेटर भारतीय प्लेयरची ही सर्वात मोठी डील आहे.
- सिंधूची ब्रॅंड अॅड्ससाठी एका दिवसाची फीस 1.25 कोटी रुपयेपर्यंत आहे. या यादीत सिंधूपेक्षा फक्त विराट कोहली आहे, ज्याची एका दिवसाची फीस 2 कोटी रुपयेपर्यंत आहे. 
- याशिवाय 2017 च्या सुरूवातीला सिंधूने 30 कोटी रूपयेंची डील साईन केली आहे. 
 
आता उपजिल्हाधिकारी-
 
- सिंधू आता फक्त एक खेळाडू नाही तर आंध्रप्रदेश सरकारने तिला उपजिल्हाधिकारीपदी नियुक्त केले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडूनी स्वत: सचिवालयात सिंधूला क्लास-1 अधिकारी नियुक्तीचे पत्र दिले होते.
 - सिंधूने मागील वर्षी जेव्हा रिओ ऑलिंपिकमध्ये बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकले होते तेव्हा आंध्रप्रदेश सरकारने तिला 3 कोटी रुपये, घरासाठी 1000 स्क्वेयर यार्डचा प्लॉट अलॉट केला होता. 
- आता वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपनंतर सिंधूला दहा लाख रुपये देण्यात येतील अशी घोषणा केली आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, भारताची सर्वात यशस्वी महिला खेळाडू काय काय करते फिटनेससाठी...
बातम्या आणखी आहेत...