आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Indian Boxer Vijender Singh Confronts Matiouze Royer During Official Weigh in

पो बॉक्सिंग: पाचव्या विजयासाठी विजेंदर सज्ज; आज रोअरशी फाइट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- सलगच्या चार विजयाने आत्मविश्वास बुलंदीवर असलेला विजेंदरसिंग अाता प्राेफेशनल बाॅक्सिंगमधील पाचवी फाइट जिंकण्यासाठी सज्ज झाला. त्याची फाइट शनिवारी मध्यरात्री फ्रान्सच्या मातीअाेझ राेअरशी हाेणार अाहे. सुपर मिडलवेट गटात हे दाेन्ही बाॅक्सर समाेरासमाेर असतील.

अाॅलिम्पिक पदक विजेत्या बाॅक्सर विजेंदरसिंगने अातापर्यंत अापल्या चारही फाइट जिंकल्या अाहेत. त्यामुळे अापली ही विजयी लय कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्याने सलग चारही विजयाची नाेंद अापल्या नावे केली अाहे. मात्र, अाता त्याच्यासमाेर फ्रान्सच्या राेअरचे तगडे अाव्हान असेल. कारण फ्रान्सच्या या बाॅक्सरला प्राेफेशनल लीगमध्ये माेठा अनुभव अाहे. त्याने अातापर्यंत ४४ फाइट खेळल्या अाहेत. यामध्ये त्याला १४ फाइटमध्ये विजय संपादन करता अाला. त्याला सात वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव अाहे. त्या मानाने विजेंदरसिंग हा अद्याप अनुभवाने लहान अाहे. मात्र, त्याने अव्वल बाॅक्सरला धूळ चारली अाहे. त्यामुळे अाता विजेंदर सिंगला फ्रान्सच्या बाॅक्सरलाही पराभूत करण्याचा विश्वास अाहे.
बातम्या आणखी आहेत...