आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड हाॅकी लीग अाजपासून; भारत-फ्रान्स यांच्यात सलामी सामना रंगणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँटवर्प- अांतरराष्ट्रीय हाॅकी फेडरेशनच्या (एफअायएच) वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलला शनिवारपासून प्रारंभ हाेत अाहे. यामध्ये महिला अाणि पुरुष या दाेन्ही गटांचा समावेश अाहे. या स्पर्धेत भारताचे महिला अाणि पुरुष संघ नशीब अाजमावणार अाहेत. स्पर्धेच्या सलामी सामन्यात फ्रान्ससमाेर अाशियाई चॅम्पियन भारतीय संघाचे तगडे अाव्हान असेल. तसेच भारताच्या महिला टीमला पहिल्या सामन्यात यजमान बेल्जियमच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल.

अाशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकासह भारतीय संघाने अागामी रिओ अाॅलिम्पिकचा प्रवेश निश्चित केला अाहे. सरदारासिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत खेळणार अाहे. फ्रान्सविरुद्ध सामन्यातून भारताचा पुरुष संघ स्पर्धेतील अापल्या विजयी माेहिमेला सुरुवात करेल. या स्पर्धेच्या तयारीसाठी झालेल्या सराव सामन्यात भारताने यापूर्वी फ्रान्सचा १-० ने पराभव केला. या सामन्यातील विजयाने भारतीय संघाचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे.

पुरुष संघाचे सामने
२० जून भारत-फ्रान्स
२३ जून भारत-पाेलंड
२६ जून भारत-पाकिस्तान
२८ जून भारत-अाॅस्ट्रेलिया

अ गट : ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, पोलंड, फ्रान्स
ब गट : बेल्जियम, चीन, इंग्लंड, मलेिशया, आयर्लंड

महिलांसमाेर बेल्जियम
जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानावर असलेला भारतीय महिला संघ यजमान बेल्जियमविरुद्ध सामन्यातून अापल्या माेहिमेचा शुभारंभ करणार अाहे. महिला गटात हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. रितू राणीच्या नेतृत्वाखाली भारताचा महिला संघ खेळणार अाहे. या स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या बळावर अागामी रिओ अाॅलिम्पिकमधील अापला प्रवेश निश्चित करण्याचा महिला टीमचा निर्धार अाहे.

महिला संघाचे सामने
२० जून भारत-बेल्जियम
२३ जून भारत-न्यूझीलंड
२४ जून भारत-पाेलंड
२७ जून भारत-अाॅस्ट्रेलिया
अ गट : फ्रान्स, इटली, कोरिया, हाॅलंड, जपान
ब गट : भारत, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, न्यूझीलंड, पोलंड
बातम्या आणखी आहेत...