आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय हॉकी संघाचा कॅनडावर ३-१ ने विजय, अझलन शाह चषक हाॅकी स्पर्धेत दुसरा विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इपाेह - गत सामन्यातील पराभवातून सावरलेल्या भारतीय हाॅकी संघाने रविवारी कॅनडाचा धुव्वा उडवला. यासह भारताच्या टीमने अझलन शाह चषक हाॅकी स्पर्धेत शानदार विजयाची नाेंद केली. भारताने ३-१ अशा फरकाने सामना जिंकला. यासह भारताला स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नाेंद करता अाली. यापूर्वी भारताने सलामीला जपानचा पराभव केला. मात्र, दुसऱ्या सामन्यात अाॅस्ट्रेलियाने भारतावर मात केली हाेती. निकिन थिमय्या (३ मि.),
हरमनप्रीतसिंग (४१ मि.), तलविंदरसिंग (५७ मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एका गाेलच्या बळावर भारतीय संघाने सामना जिंकला. कॅनडासाठी किंगन पेरेरियाने सामन्याच्या २३ व्या मिनिटाला गाेल केला. मात्र, त्यानंतर टीममधील अव्वल खेळाडूंना भारताविरुद्ध गाेल करता अाला नाही. त्यामुळे कॅनडा टीमचा हा सामन्यातील एकमेव गाेल ठरला. या विजयासह भारतीय संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर धडक मारली.

अाॅस्ट्रेलियाचा पाकला ४-० ने दणका
वर्ल्ड चॅम्पियन अाॅस्ट्रेलिया टीमने रविवारी विजयाची हॅट्ट्रिक नाेंदवली. या टीमने स्पर्धेतील अापल्या तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा दणका दिला. अाॅस्ट्रेलियाने ४-० अशा फरकाने सामन्यात एकतर्फी विजयाची नाेंद केली. अाॅस्ट्रेलियाचा स्पर्धेतील हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह अाॅस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम अाहे.