आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय हाॅकी टीम बेल्जियमला रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्या २० जूनपासून एफअायएचच्या वर्ल्ड लीग हाॅकी सेमीफायनलला प्रारंभ हाेणार अाहे. अाशियाई चॅम्पियन भारतीय हाॅकी संघ या स्पर्धेसाठी साेमवारी रात्री बेल्जियमला रवाना झाला. ही स्पर्धा २० जून ते ५ जुलैदरम्यान बेल्जियम येथे रंगणार अाहे. भारतासह दहा संघ सेमीफायनलमध्ये सहभागी झाले अाहेत. या स्पर्धेतील अव्वल चार टीम अागामी हाॅकी वर्ल्ड लीगमधील अापला प्रवेश निश्चित करतील. ही हाॅकी लीग येत्या नाेव्हेंबर-डिसेंबरमध्ये हाेणार अाहे.
सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्पर्धेत सहभागी हाेणार अाहे. भारताचा अ गटात समावेश करण्यात अाला. याच गटात अाॅस्ट्रेलिया, फ्रान्स, पाकिस्तान अाणि पाेलंडच्या टीमचादेखील सहभाग अाहे. भारतीय संघाला गटात बलाढ्य अाॅस्ट्रेलिया अाणि फ्रान्सच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. याशिवाय भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी हाेईल.
वर्ल्ड लीग सेमीफायनलमधील अव्वल तीन टीमला अागामी रिओ अाॅलिम्पिकचे तिकीट मिळणार अाहे. भारतीय संघाने अाशियाई स्पर्धेतील सुवर्णपदकासह रिओ अाॅलिम्पिकचा प्रवेश निश्चित केला अाहे.