आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RIO: किट न मिळाल्याने भारतीय हॉकी संघ नाराज, उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिअाे दि जानेरिअाे - ऑलिम्पिकच्या उदघाटना आधीच भारतीय हॉकीचा संघर्ष तीव्र झाला आहे. भारतीय हॉकी संघाला योग्य किट मिळाली नाही. त्यामुळे उदघाटन समारंभावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचेे प्रशिक्षक रोलेंट ओल्टमेंस यांनी सांगितले. खेळाडूच रिओत पोहचले उशिरा
- भारतीय हॉकीचे खेळाडू रिओत उशिरा पोहचले. त्यामुळे ते शर्टची साईज तपासून घेऊ शकले नाहीत.
- ओल्टमेंस यांनी यापूर्वीच खेळाडूंना पुरेशा सुविधा मिळाल्या नसल्याची तक्रार केली होती
- भारताची पुरुष हॉकी टीम शनिवारी आपली पहिली मॅच आर्यंलॅंडसोबत खेळणार आहे.
राकेश गुप्ता-नरेंद्र बत्रा आमने सामने
- दरम्यान, भारतीय पथथ प्रमुख राकेश गुप्ता यांनी हॉकी इंडियाला दोन आठवड्यापूर्वीच कीट दिले असल्याचे सांगितले. हॉकी इंडियांचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा आणि कोच ओल्टमेंस यांचे आरोप चुकीचे आहेत.
दुसरीकडे बत्रा यांनी उद्घाटन सोहळ्यानंतर लगेच दुस-या दिवशी आमच्या संघाला आर्यलँडविरोधात सामना खेळायचा आहे. त्यामुळे या सोहळ्यात सहभागी होऊन खेळाडूंना थकवा जाणवू नये म्हणूनच आम्ही या सोहळ्यात सहभाग घेतला नाही असे सांगितले.
याआधी रंगला होता सामना-
- रिओ नगरीत येताच भारतीय खेळाडूंनी तक्रारींचा पाढा वाचायला सुरुवात केली होती. टीव्ही नाही, केबल नाही, फर्निचर-खुर्च्या नाहीत अशा एकामागोमाग एक तक्रारी भारतीय खेळाडूंनी केल्या. यानंतर आयओसीने भारतीय पथक प्रमुखाला खडे बोल सुनावले होते.
- हॉकी संघांतील खेळाडूंना टीव्ही संच हवेत, टेबल आणि खुर्च्या हव्या होत्या. परंपरेनुसार पथक प्रमुख गुप्ता यांनी केवळ प्रसिद्धिमाध्यमांना माहिती दिली की भारतीय दूतावासामार्फत या गोष्टींची खरेदी करून दिली जाणार आहे.
- प्रत्यक्षात काहीही घडले नाही. त्यामुळे हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर रोएलंट ओल्टमस यांनी स्वत: 20 खुर्च्या टेबले आणली.
- त्यावर नरेंद्र बात्रा यांनी हॉकी खेळाडूंचा फोटो प्रसिद्ध करून या खुर्च्या टेबल्स आयओएने आणलेल्या नाहीत, अशी पुस्तीही सोबत जोडली.
- त्यांनी भारतीय पथकाचे अकार्यक्षम प्रमुख राकेश गुप्ता स्वत:चे फोटो छापून आणण्यात गुंग असल्याचे जाहीर करून टाकले.
- ओल्टमन यांना बात्रा यांनी संघाच्या गरजेच्या वस्तू विकत घेण्याची परवानगी देऊन टाकली. पथक प्रमुखांकडून काहीही अपेक्षा करू नका, असे सांगायलाही बात्रा विसरले नाहीत.
- भारतीय खेळाडू पर्यटनाला आले आहेत, टेलिव्हिजन पाहायला की पदके जिंकायला, असा संभ्रम भारतीय क्रीडाधिकाऱ्यांमधील ही लढाई पाहणाऱ्यांना पडला आहे. या वादामुळे भारतीय गटाची ऑलिम्पिक क्रीडाग्राममध्ये प्रतिमा बिघडली आहे.
- हॉकी इंडियाचे नरेंद्र बात्रा यांनी भारतीय पथक प्रमुख राकेश गुप्ता यांच्यावर अनेक आरोपांची अस्त्रे सोडली असून तमाम क्रीडाविश्व भारतीय क्रीडाधिकाऱ्यांमधील या सुंदोपसुंदीचा आनंद घेत आहे.
पुढे वाचा, रिओत आज भारतीय खेळाडूंच्या आज कोणत्या कोणत्या लढती आहेत...
बातम्या आणखी आहेत...