आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला विजयी, कॅनडावर १-० ने केली मात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅस्टिंग - सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून भारतीय महिला टीम हावके बे चषक हाॅकी स्पर्धेत विजयी ट्रॅकवर अाली अाहे. भारतीय महिलांनी शनिवारी सामन्यात कॅनडावर मात केली. भारताने राेमांचक लढतीत १-० ने विजयाची नाेंद केली. लिलिमा मिन्झने (४३ मि.) केलेल्या एकमेव गाेलच्या बळावर भारताने रंगतदार सामना जिंकला. यासह भारतीय महिला टीमचा स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. अाता रविवारी भारतीय महिला संघाचा सामना अायर्लंडशी हाेणार अाहे.

गत सामन्यातील पराभवातून सावरलेल्या भारतीय महिला टीमने सामन्यात सरस खेळी केली. त्यामुळे कॅनडा टीमचे गाेल करण्याचे अनेक प्रयत्न अपयशी ठरले. यातून पहिला हाफ शून्य गाेलमध्ये हा सामना रंगला.
(संग्रहित छायाचित्र)