आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

37 वर्षांनंतर भारतीय पुुरुष बॅडमिंटनपटू टाॅप-2 मध्ये! श्रीकांत दुसऱ्या स्थानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अांतरराष्ट्रीय स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावत के. श्रीकांत सध्या बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीमध्येही चमकत अाहे. त्याने नुकताच फ्रेंच अाेपन सुपर सिरीजचा किताब जिंकला. यासह त्याने तब्बल ३७ वर्षांनंतर क्रमवारीत प्रगती साधली. पुरुषांच्या क्रमवारीमध्ये श्रीकांतने दुसरे स्थान गाठले. यासह ताे १९८० नंतर प्रथमच टाॅप-२ मध्ये स्थान मिळवणारा भारतीय बॅडमिंटनपटू ठरला. यामध्ये ३७ वर्षांपूर्वी माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकाेण यांनी अव्वल स्थान गाठले हाेते. नुकतीच जागतिक बॅडमिंटन महासंघाने क्रमवारी जाहीर केली. याच क्रमवारीमध्ये प्रणयने  करिअरमधील सर्वाेत्तम स्थान गाठले. ताे ११ व्या स्थानावर विराजमान झाला अाहे.  

२ वर्षांनंतर तिसरा भारतीय 
गत २०१५ नंतर प्रथमच भारताच्या तिसऱ्या बॅडमिंटनपटूने टाॅप-५ मध्ये धडक मारली. श्रीकांतने यापूर्वी चाैथे स्थान गाठले हाेते. याशिवाय २००१ मध्ये माजी खेळाडू अाणि राष्ट्रीय प्रशिक्षक पी. गाेपीचंद यांनी क्रमवारीत पाचवे स्थान गाठले हाेते.  

चायना अाेपननंतर नंबर वनची संधी
फ्रेंच अाेपन चॅम्पियन के. श्रीकांतला अाता लवकरच नंबर वनचे सिंहासन गाठण्याची संधी अाहे. या किताबामुळे त्याचे ७३४०३ गुण झाले अाहेत. तसेच डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलन्सन हा नंबर वन अाहे. त्याचे एकूण ७७९३० गुण अाहेत. अाता दाेन अाठवड्यांनंतर चीन अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात हाेईल.  दुसऱ्यांदा किताब  जिंकल्यास के. श्रीकांत हा अव्वल स्थानावर विराजमान हाेईल. यामुळे व्हिक्टरची दुसऱ्या स्थानी घसरण हाेऊ शकते. गत २०१४ मध्ये चीन अाेपनमध्ये चॅम्पियनचा बहुमान पटकावल्यानंतर के. श्रीकांत फाेकसमध्ये अाला हाेता. यादरम्यान त्याने चीनच्या डॅनचा पराभव करून जेतेपद पटकावले हाेते.  
 
एप्रिलपासून जबरदस्त फाॅर्मात श्रीकांत
सत्राच्या सुरुवातीला के. श्रीकांत हा गंभीर दुखापतीतून सावरला अाणि त्याने दमदार पुनरागमन केले. सिंगापूर अाेपनमधील    सुरेख खेळीच्या बळावर त्याने शानदार कमबॅकचे संकेत दिले. यादरम्यान त्याला फायनलमध्ये अापल्याच देशाच्या बी. साई प्रणीतकडून पराभव पत्करावा लागला हाेता. त्यानंतर त्याने शानदार खेळी करताना इंडाेनेशिया अाेपन, अाॅस्ट्रेलियन अाेपन, डेन्मार्क अाेपन अाणि अाता फ्रेंच अाेपनचा किताब जिंकला अाहे.  
 
टाॅप-२५ मध्ये अाहेत तीन भारतीय खेळाडू
पुरुष एकेरीच्या टाॅप-२५ मध्ये बी.साई प्रणीत, समीर वर्मा अाणि अजय जयराम चमकले.  प्रणीतने १६ वे, समीरने १८ वे व जयरामने २२ वे स्थान कायम ठेवले.   
-  सिंधूने महिला एकेरीच्या क्रमवारीतील अापले दुसरे स्थान कायम ठेवले. तसेच सायना नेहवाल ११ व्या स्थानावर अाहे.   
 
 
लय कायम राहिल्यास विदेशी खेळाडूंसमाेर दबदबा 
यंदाच्या सत्रामध्ये चार किताब जिंकून के. श्रीकांतने अापला नंबर वन हाेण्याचा दावा मजबूत केला अाहे. यामुळे साेनेरी यशाची हीच लय कायम राहिली, तर बॅडमिंटनच्या विश्वातील विदेशी सुपरस्टार समाेर भारतीय युवा खेळाडूंचा दबदबा निर्माण हाेईल. चीनच्या खेळाडूंना वेळाेवेळी पराभूत करून ही क्षमताही भारताच्या के. श्रीकांत, कश्यप, सिंधू अाणि सायनाने सिद्ध केली. यासाठी दाेन वर्षांपर्यंत ही लय कायम ठेवण्याची गरज अाहे. अाता या स्पर्धेत भारताच्या या युवांवर सर्वांची खास नजर असते. 
बातम्या आणखी आहेत...