आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: मोबाईलने केला जुन्‍या खेळांचा \'गेम\', पाहा कोणते आहेत ते खेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Fact Placeholder
औरंगाबाद - वाढते शहरीकरण आणि माध्‍यमांच्‍या प्रसारामुळे उपलब्‍ध झालेली मनोरंजनाची भक्‍कम साधने यामुळे जुने भारतीय खेळ हद्दपार होत आहेत. ग्रामीण भागात कृषी संस्कृतीवर आधारित मैदानी आणि बैठे खेळ पूर्वी खेळल्‍या जात होते. मात्र नवीन पिढीला त्‍या खेळांची साधी ओळखही नाही. या पॅकेजमधून जाणून घेऊया कोणते आहेत असे खेळ.
मैदानी खेळ - विटी दांडू, कबड्डी, लंगडी, मामचे पत्र, लगोरी, चोर पोलिस, डाबडुबली, घोडी, खुपसणी, शिवाशिवी, विषामृत, कुस्‍ती, धब्‍बाकुटी अशा विविध प्रकारचे मैदानी खेळ ग्रामीण भागात लोकप्रिय होते.
बैठे खेळ - मुली आणि मुलांमध्‍ये पूर्वी चंफुल, वाघ बकरी, चोर शिपाई, सागरगोट्या, भेंड्या, चिमणी उड, दगड झेल अशा विविध प्रकारची खेळ खेळल्‍या जात होती.
मोबाईल गेममुळे हरवले खेळ
स्‍मार्टफोनचा व्‍याप वाढल्‍याने आज घराघरातील लहान मुलांना सहज फोन उपलब्‍ध झाला आहे. त्‍यामुळे मैदानी खेळांकडे मुलांचे दुर्लक्ष होत आहे. शिवाय क्रिकेटचा प्रभावातही मैदानी खेळ हरवले आहेत.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, जुन्‍या खेळांचे काही फोटो..