आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय भालाफेकपटू 34 वर्षांनंतर फायनलमध्ये; क्रिस्टियन चॅम्पियन!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- दाेन वेळच्या अाॅलिम्पिक चॅम्पियन क्रिस्टियन टेलरने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत इतिहास रचला. त्याने पुरुष गटाच्या तिहेरी उडी प्रकारात तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याची एेतिहासिक कामगिरी केली. अशा प्रकारे तिहेरी उडीत तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन हाेणाऱ्या अमेरिकेचा क्रिस्टियन टेलर हा जगातील पहिला खेळाडू अाहे. दुसरीकडे भारताच्या देविंदरसिंग कांगने भालाफेक प्रकारामध्ये फायनल गाठली. यासह भारताच्या भालाफेकपटूने ३४ वर्षांनंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचा पल्ला गाठला. यामध्ये विश्वविक्रमवीर युवा भालाफेकपटू नीरज चाेपडाची निराशा झाली.

भारतीय संघासाठी या दिवसाची कामगिरी ही समिश्र यश देणारी ठरली. भालाफेकपटू नीरजवर सर्वांची नजर हाेती. त्याला समाधानकारक कामगिरी करता अाली नाही. त्यामुुळे ही नाराजी देविंदरने दुर केली. शिवाय पदकाची अाशा पल्लवीत केली.

१७.६८ मी. उडी घेत पटकावले सुवर्ण
क्रिस्टियन टेलरने लंडनमध्ये तिहेरी उडीच्या फायनलमध्ये अापल्याच देशाच्या िवल क्लेला पिछाडीवर टाकले. त्याने १७.६८ मीटर उडी घेत सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. यामुळे विलला राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने १७.६३ मीटरपर्यंत उडी घेतली. तसेच २००८ च्या अाॅलिम्पिक चॅम्पियन नेल्सन इव्हाेराने १७.१९ मीटर तिहेरी उडी घेऊन कांस्यपदक पटकावले.  

क्रिस्टियन तिसऱ्यांदा चॅम्पियन    
क्रिस्टियन टेलरने अाता तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी २०११ (देगू) अाणि २०१५ मध्ये बीजिंग येथील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले हाेते. 

विश्वविक्रमवीर नीरजची निराशा
भारताच्या ज्युनियर विश्वविक्रमवीर नीरज चाेपडाची निराशा झाली. त्याला भालाफेक प्रकारात अपयशाला सामाेरे जावे लागले. त्याने पात्रता फेरीमध्ये ८२.८६ मीटरपर्यंत भालाफेक केली. मात्र, त्याला फायनलमधील प्रवेश निश्चित करता अाला नाही. त्याची ही करिअरमधील सर्वाेत्कृष्ट कामगिरी ठरली. मात्र, ताे १५ व्या स्थानावर राहिला. यातुनच त्याची निराशा झाली.

देविंदरने ८४.२२ मी.च्या थ्राेने रचला इतिहास 
भारताच्या अनुभवी खेळाडू देविंदरसिंगने पात्रता फेरीत ८२.२२ मीटरचा भालाफेक करून ३४ वर्षांनंतर इतिहास रचण्याची कामगिरी केली. त्याने पात्रता फेरीच्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये अंतिम फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. त्याने ८२.२२ मीटरचे अंतर गाठले. सुरुवातीला त्याने ८२.१४ मीटरचा थ्राे केला हाेता. यामुळे त्याने अाेव्हरअाॅलमध्ये सातवे अाणि ब गटात पाचव्या स्थानावर धडक मारली.  अाता त्याला पदकाची अाशा अाहे. 
बातम्या आणखी आहेत...