आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Star Saina Nehwal Vs Carolina Marin, BWF World Championships Final

वर्ल्ड चॅम्पिअनशिप: पराभवानंतरही सायनाने रचला इतिहास, ठरली सिल्व्हर जिंकणारी पहिली भारतीय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता- वर्ल्ड नंबर-2 इंडियन स्टार शटलर सायना नेहवालला वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पिअनशिपच्या फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन कॅरोलिन कडून पराभवाचा सामना करावा लागला. या स्पॅनिश स्टारने सायनाला सलग सेटमध्ये 21-16 आणि 21-19 ने हरवले. या पराभवामुळे सायनाला सिल्व्हर मेडलवरच समाधान मानावे लागले. भारतीय शटलरने वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पिअनशिपमध्ये सिल्व्हर मेडल जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सायनाला पहिल्या गेममध्ये वर्ल्ड नंबर वन कॅरोलिनाकडून पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीला पिछाडीवर पडल्यानंतर सायनाने जोरदार पुनरागमन केले खरे. मात्र तरी स्पेनिश शटलरकडून तिला 16-21 ने पराभूत व्हावे केले. सायनाला गेल्यावर्षी मरिन कडून ऑल इंग्लंड चॅम्पिअनच्या फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
सेमीफायनलमध्ये काहीसा असा हराहिला रिजल्ट
सायना- सायना नेहवालने इंडोनेशियाच्या लिंडावेनी फेनेत्रीला सलग गेमध्ये 21-17 - 21-17 ने हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. सायना वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या फायनलमध्ये पोहचनारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिच्या आधीपर्यंत कोणीही भारतीय पुरुष अथवा महिला खेळाडू फायनलमध्ये पोहचलेले नव्हते. हा सामना 55 मिनिटे चालला होता.
कॅरोलिना : वर्ल्ड नंबर वन खेळाडू असलेली स्पेनची कॅरोलिना मरिनने 8व्या सीड कोरियाच्या सुंग जी ह्यूनला एकतास 30 मिनिटात 21-17, 15-21, 21-16ने पराभूत केले होते.
सायनाच्या आधी केवळ ब्राँन्झ
सायनाच्या आधीपर्यंत वर्ल्ड चॅम्पिआनशिपच्या इतिहासात भारताच्या नावे चार ब्राँझ मेडल होते. प्रकाश पादुकोण यांनी 1983 मध्ये, ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाच्या महिला जोडीने 2011 मध्ये तर पीव्ही सिंधू हिने 2013-14 मध्ये ब्राँझ मेडल जिंकले होते.