आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेल्कामुळे मुंबई सिटी एफसीचा दावा मजबूत!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या ३ अाॅक्टाेबरपासून दुसऱ्या सत्राच्या इंडियन सुपर लीग (अायएसएल) फुटबाॅल लीगला सुरुवात हाेणार अाहे. या दुसऱ्या सत्रातील स्पर्धेत मुंबई सिटी एफसी संघाने अापला विजेतेपदाचा दावा अधिक मजबूत केला अाहे. या स्पर्धेसाठी सिनेअभिनेता रणबीर कपूरच्या मुंबई टीमने फ्रान्सच्या माजी दिग्गज स्ट्रायकर निकाेला अनेल्कासाेबत करार केला अाहे. मुंबईने दुसऱ्या सत्रासाठी अापल्या अायकाॅन खेळाडूच्या रूपात हा करार केला. त्यामुळे अाता अायएसएलच्या दुसऱ्यास सत्रात अनेल्का हा मुंबई टीमचे प्रतिनिधित्व करणार अाहे.
अनेल्काने अापल्या फुटबाॅलच्या करिअरमध्ये ६० अांतरराष्ट्रीय सामने खेळले अाहेत. गत सत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना अनेल्काने सर्वाेत्कृष्ट खेळाडूंमध्ये पाचवे स्थान गाठले हाेते.

अार्सेनल, चेल्सीचे प्रतिनिधित्व
अनेल्काला अव्वल क्लबकडून ५०० पेक्षा अधिक सामने खेळण्याचा माेठा अनुभव अाहे. त्याने अार्सेनल, चेल्सी, रिअल माद्रिद, लिव्हरपूलसारख्या माेठ्या क्लबचे प्रतिनिधित्व केले अाहे.
लुसिमार सिल्वाचा गाेवा एफसीसाेबत करार
पणजी | इंडियन सुपर लीग (अायएसएल) फुटबाॅल स्पर्धेसाठी गाेवा एफसीने लुसिमार फेराराे डी सिल्वासाेबत करार केला अाहे. ताे लुसिया नावाने प्रसिद्ध अाहे. अाता अायएसएलच्या अागामी दुसऱ्या सत्रामध्ये सिल्वा हा खेळणार अाहे. ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना त्याने २००२ मध्ये टीमला विश्वविजेता हाेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच ब्राझीलचा स्टार डिफेंडर अांद्रेदेखील गाेवा एफसीसाेबत करारबद्ध झाला अाहे. अाता हे दाेन्ही खेळाडू अायएसएलमध्ये गाेवा टीमचे प्रतिनिधित्व करतील.