आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Super League Football: Yugensen Get 1 Crores For Pune FC

युगेनसेनचा दबदबा; पुणे एफसीसाेबत एक काेटीचा करार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिनेअभिनेता हृतिक राेशनसाेबत युगेनसेन व जॅकीचंद. - Divya Marathi
सिनेअभिनेता हृतिक राेशनसाेबत युगेनसेन व जॅकीचंद.
मुंबई - भारतीय फुटबॉलचा चेहरा किंवा ‘पोस्टर बॉय’ म्हणून ओळखला जाणारा भारतीय फुटबॉल संघाचा कप्तान सुनील छेत्री याला इंडियन सुपरलीग फुटबॉल खेळाडूंच्या पहिल्यावहिल्या लिलावात सर्वोत्तम व सर्वाधिक बोली लावली गेली. मात्र, या बाेली प्रक्रियेत युगेनसेन लिंगडाेह हा सर्वाधिक चर्चेचा चेहरा ठरला. त्याला एफसी पुणे टीमने १ काेटी ५ लाखांमध्ये करारबद्ध केले.
बायचुंग भुतिया यांच्यानंतर भारतीय फुटबॉलमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या सुनील छेत्रीला मुंबई सिटी फुटबॉल क्लबने १ कोटी २० लाख रु.ला घेतले. मात्र, दिल्ली व मुंबई या दोनच संघांनी त्याच्यासाठी बोली लावल्यामुळे पायाभूत किंमत ८० लाख रु.असतानाही त्याला अपेक्षेपेक्षा कमी किंमत मिळाली.

सिनेकलावंत रणबीर कपूर याच्या मुंबई सिटी एफसीने विकत घेतल्यानंतर कमी किंमत मिळाल्याबद्दल छेत्रीने नाराजी व्यक्त केली नाही. तो म्हणाला, १३ वर्षे मी उच्च पातळीवरचे फुटबॉल खेळल्यामुळे मला पैसे पुरेसे मिळाले आहेत. छेत्रींना देशासाठी ८७ सामने खेळून ४० गोल केले आहेत. एका कोटी रु.पेक्षा अधिक किंमत मिळालेला दुसरा फुटबॉलपटू लिंगडोह ठरला.