आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Team Defeated Nepal In South Asian Basketball Championship

भारतीय टीमकडून नेपाळचा धुव्वा, दक्षिण अाशियाई बास्केटबाॅल चॅम्पियनशिप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - भारतीय संघाने दक्षिण अाशियाई बास्केटबाॅल चॅम्पियनशिपमधील (साबा) अापल्या माेहिमेला शुक्रवारी धडाकेबाज विजयाने सुरुवात केली. भारताच्या टीमने स्पर्धेतील सलामी सामन्यात नेपाळचा धुव्वा उडवला. यजमान टीमने पहिल्या फेरीतील सामन्यात ९०-३७ अशा फरकाने विजयाची नाेंद केली. अाता अागामी सामन्यातही ही विजयाची लय कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

ज्युनियर टीमचा माजी कर्णधार गुरविंदरसिंग, कर्नाटकचा अरविंदर अाणि अन्नादुराईच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने सलामीचा सामना जिंकला. नेपाळविरुद्ध भारताचे अमृतपालसिंग, अमरज्याेतसिंग, यदविंदर अाणि भृगुवंशीसारखे अव्वल खेळाडू खेळू शकले नाहीत. मात्र, या दिग्गजाच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी सरस खेळी करून भारताचा माेठ्या फरकाने विजय साकारला अाहे.

भूकंपामुळे नेपाळ टीम सरावाला मुकली!
पिछाडीवर पडलेल्या नेपाळने शेवटपर्यंत प्रत्युत्तराची खेळी कायम ठेवली. मात्र, टीमला समाधानकारक यश संपादन करता अाले नाही. भूकंपाचा फटका टीमला बसला. काठमांडू येथील दशरथ इनडाेअरचे मैदान भूकंपात भुईसपाट झाले. त्यामुळे या टीमला सराव करता अाला नाही.