आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला तिरंदाज टीमला अाॅलिम्पिकचे तिकीट!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेपनहेगन - भारतीय महिला तिरंदाजी संघाने अागामी २०१६ रिअाे अाॅलिम्पिक स्पर्धेतील अापला प्रवेश निश्चित केला. दुसरीकडे भारताच्या पुरुष टीमला पराभवाला सामाेरे जावे लागले. जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमधील उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर भारतीय महिला टीमने रिअाे अाॅलिम्पिकचे तिकीट मिळवले. दीपिका कुमारी, लक्ष्मी राणी अाणि रिमिल बुरीलीने सातव्या मानांकित जर्मनीविरुद्ध शानदार विजयाची नाेंद केली. भारतीय रिकर्व्ह टीमने ५.३ अशा फरकाने विजय संपादन केला. यासह भारताने अंतिम अाठमधील प्रवेश निश्चित केला. त्यानंतर भारतीय महिला संघाने काेलंबाया अाणि जपानसविरुद्ध सलग विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली.

...तरीही मारली बाजी
जर्मनीविरुद्ध भारतीय महिला रिकर्व्ह टीमला विजयासाठी शर्थीची झंुज द्यावी लागली. सातव्या मानांकित जर्मनीने शानदार कामगिरीसह भारताविरुद्ध अाघाडी मिळवली हाेती. जर्मनीच्या करिना, एलेना अाणि लिसाने पहिला सेट ५९.४६ ने जिंकला. मात्र, त्यानंतर दीपिका, लक्ष्मी अाणि रिमिलने पिछाडीवर पडलेल्या टीमचे दमदार पुनरागमन केले. यासह महिला टीमने दुसरा सेट जिंकून बराेबरी साधली. त्यानंतर जर्मनीने तिसरा सेट ५१.५० ने जिंकला. दरम्यान, भारतीय महिला टीमने निर्णायक सेट ५३.५२ ने जिंकून अाॅलिम्पिकचा काेटा पूर्ण केला.

इटलीविरुद्ध पुरुष टीम पराभूत
भारताच्या पुरुष टीमला इटलीविरुद्ध पराभवाला सामाेरे जावे लागले. इटलीने भारतावर २९-२६ ने मात केली. भारतीय संघातील राहुल बॅनर्जी, मंगल सिंग अाणि जयंत तालुकदार हे अव्वल तिरंदाज सपशेल अपयशी ठरले.