आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकी लीग सेमीफायनल: भारतीय पुरुष संघ विजयी; महिला पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँटवर्प- अाशियाई चॅम्पियन भारतीय पुरुष संघाने शनिवारी एफअायएचच्या वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलमध्ये शानदार विजयी सलामी दिली. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या फेरीत फ्रान्सचा ३-२ अशा फरकाने पराभव केला. मात्र, रितू राणीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय महिला टीमला पहिल्या फेरीतील सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. यजमान बेल्जियमने भारताला १-० ने पराभूत केले. महिला गटात न्यूझीलंड व हाॅलंडने धडाकेबाज विजयाची नाेंद केली. न्यूझीलंडच्या महिला टीमने अापल्या सलामी सामन्यात पाेलंडचा १२-० ने पराभव केला. तसेच हाॅलंडने सामन्यात फ्रान्सवर ११-० ने मात केली.
बातम्या आणखी आहेत...