आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला दुसऱ्यांदा चॅम्प; भारतीय संघाने पटकावला अाशिया चषक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काकामिगहारा (जपान)- राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हाॅकी संघ रविवारी अाशिया चॅम्पियन ठरला. भारताच्या संघाने महिलांच्या हाॅकी स्पर्धेत अाशिया चषक अापल्या नावे केला. भारताने फायनलमध्ये चीनच्या महिलांचा पराभव केला. भारतीय संघाने ५-४ ने पेनल्टी शूटअाऊटमध्ये राेमहर्षक विजय संपादन केला. निर्धारित वेळेत सामना १-१ ने बराेबरीत राहिला हाेता. त्यानंतर शुटअाऊट पेनाल्टीमध्येही ४-४ ने बराेबरी साधली. मात्र, त्यानंतर सडन डेथमध्ये राणीने गाेल करून भारताचा किताब निश्चित केला. 

यामध्ये भारताकडून नवज्याेत काैरने (२५ वा मि.) एकमेव गाेल केला हाेता. तसेच तिअांतिअानने (४७ व मि.) चीनसाठी एकमेव गाेल केला. 
 
वर्ल्डकपसाठी महिला संघ पात्र 
अाशिया चषक जिंकून भारतीय महिला संघाने अागामी हाॅकी वर्ल्डकपमधील अापला प्रवेश निश्चित केला. हा विश्वचषक हाॅकी स्पर्धा पुढच्या वर्षी इंग्लंडमध्ये हाेणार अाहे. यामुळे भारताला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली अाहे.   
 
सात वर्षांनंतर वर्ल्डकप खेळण्याची संधी
भारतीय महिला संघ अाता तब्बल अाठ वर्षांनंतर वर्ल्डकपमध्ये खेळणार अाहे. गत २०१४ च्या वर्ल्डकपमध्ये भारताला सहभागी हाेता अाले नाही. सुमार कामगिरीमुळे टीमला पात्रता पूर्ण करता अाली नव्हती. तसेच २०१० च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ पात्र ठरला हाेता. यादरम्यान भारतीय महिलांना नवव्या स्थानी समाधान मानावे लागले हाेते.
 
१३ वर्षांनंतर जिंकला दुसऱ्यांदा किताब 
 
भारतीय महिला टीम तब्बल १३ वर्षांनंतर चॅम्पियन ठरली अाहे. भारताला एका तपानंतर अाशिया चषकावर नाव काेरता अाले. यापूर्वी भारताने २००४ मध्ये अाशिया चषक जिंकला हाेता. यासाठी भारतीय महिलांनी फायनलमध्ये जपानचा पराभव केला हाेता. त्यानंतर अाता १३ वर्षांनी म्हणजे २०१७ मध्ये भारतीय महिला मानकरी ठरल्या.   
 
 विजेते संघ   
सुवर्ण - भारत  
राैप्य -  चीन  
कांस्य - दक्षिण काेरिया  
बातम्या आणखी आहेत...