आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Indian Women Hockey Captain Ritu Rani Is Now Engaged To This Punjabi Singer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रसिद्ध पंजाबी गायकावर जडला हॉकीच्या या \'राणी\'चा जीव, लवकरच करणार विवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार रितु राणीची इंगेजमेंट पटियालाचा पंजाबी गायक हर्ष शर्मा ऊर्फ हॅश याच्यासोबत झाला. - Divya Marathi
भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार रितु राणीची इंगेजमेंट पटियालाचा पंजाबी गायक हर्ष शर्मा ऊर्फ हॅश याच्यासोबत झाला.
शाहाबाद- भारतीय महिला हॉकीची कर्णधार रितु राणीची नुकतीच इंगेजमेंट झाली. रितूता साखरपुडा पटियालाचा पंजाबी गायक हर्ष शर्मा ऊर्फ हॅश याच्यासोबत झाला. रितु रिओ ऑलिंपिक-2016 मध्ये भारतीय संघाची कर्णधार असेल. या दोघांनी ऑलिंपिकनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रितुला भीम अवॉर्ड मिळाला आहे. तर हॅश लोकप्रिय पंजाबी सिंगर आहे. असे आहे दोघांचे कॉमन कनेक्शन...
- हर्ष शर्मा पटियालाचा रहिवासी आहे. त्याची आई पूनम बाला पटियालात एनआयएस (स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया) मध्ये हॉकी कोच आहे.
- याबाबत रितु राणी म्हणाली, जोडीदार म्हणून मला हर्षसारखा साथीदार मिळाला म्हणून मी खूपच आनंदी आहे.
- मात्र, आम्ही ऑलिंपिकनंतर लग्न करणार आहोत. माझे संपूर्ण लक्ष्य ऑलिंपिकच्या तयारीवर आहे.
- ऑलंपिकनंतर लग्नाची तारीख ठरवली जाईल. दुसरीकडे हर्ष शर्माही रितु राणीचे कौतूक करताना थकत नसल्याचे दिसून आले.
सध्या इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आहे इंस्पेक्टर
- रितु हरियाणातील शाहाबादची आहे. ती भारतीय संघात हाफबॅक पोजिशनला खेळते.
- तिच्या नेतृत्त्वाखाली इंचियोनमध्ये झालेल्या एशियन गेम्स-2014 मध्ये भारतीय महिला संघाने ब्रॉन्ज मेडल जिंकले होते.
- तिने दोहात झालेल्या एशियन गेम्स-2006 मध्ये भारतीय संघाकडून खेळण्यास सुरुवात केली होती.
- रितु भारताकडून खेळणारी सर्वात तरूण खेळाडू ठरली होती. तिने वयाच्या 14 वर्षी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
- रितुने क्रीडा कोट्यातून प्रथम रेल्वे ज्वाईन केली होती. नंतर हरियाणा पोलिसात पीएसआय म्हणून रूजू झाली.
- आता रितु राणी इनकम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इंस्पेक्टर आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रितु राणी आणि पंजाबी सिंगर हर्ष यांच्या इंगेजमेंटचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...