आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकी मालिका: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, बेलारुसवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाेपाळ - सलामीच्या विजयाने अात्मविश्वास बुलंदीवर असलेल्या भारतीय महिला संघाने हाॅकी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बेलारुसचा पराभव केला. भारताच्या महिला संघाने घरच्या मैदानावर शनिवारी दुसऱ्या सामन्यात २-१ ने विजय संपादन केला. स्टार स्ट्रायकर राणी (१९ वा मि.) अाणि लार्लेस्मिमी (६० वा मि.) यांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर भारताने सामना जिंकला. भारताचा पाच हाॅकी सामन्यांच्या मालिकेत हा सलग दुसरा विजय ठरला.  यासह भारताने मालिकेत २-० ने अाघाडी घेतली.   
 
भारताने  १९ व्या मिनिटाला सामन्यात १-० ने अाघाडी घेतली. स्ट्रायकर राणीने भारताकडून गाेलचे खाते उघडले. त्यानंतर १७ मिनिटांमध्ये स्वेतलानाने केलेल्या गाेलच्या बळावर बेलारुसने सामन्यात १-१ ने बराेबरी मिळवली हाेती. मात्र, ६० व्या मिनिटाला लार्लेस्मिमीने गाेल करून भारताचा विजय निश्चित केला.
बातम्या आणखी आहेत...