आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन वुमन्स हॉकी टीमने जिंकला आशिया कप, शूटआउटमध्ये चीनला 5-4 ने दिली मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काकामिगहारा (जपान) - इंडियन वुमन्स हॉकी टीमने आशिया कप टूर्नामेंट काबिज केली आहे. फायनलमध्ये भारताने चीनला पराभूत केले. शेवटपर्यंत सामना 1-1 अशा बरोबरीवरच होता. यानंतर विनर शूटआऊटने ठरवला जाणार असा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये भारताने चीनला 5-4 ने मात दिली आहे. या विजयासोबतच भारतीय टीमने वर्ल्ड कपसाठी पात्रता सिद्ध केली आहे. 
 
दुसऱ्यांदा जिंकला आशिया कप
> भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी इंडियन वुमन्स टीमने 2004 मध्ये जपानला पछाडून पहिल्यांदा आशिया कप जिंकला होता. तर, 1999 आणि 2009 मध्ये टीम उपविजेती राहिली आहे. 
> भारतीय महिलांनी शुक्रवारी यापूर्वी चॅम्पियन राहिलेला संघ जपानला 4-2 ने पराभूत करून फायनलमध्ये धडक मारली होती. तर, चीनचा संघ दक्षिण कोरियाला पराभूत करून फायनलमध्ये पोहोचला होता.
बातम्या आणखी आहेत...