आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Women's Team At 5th Position In World Hockey League

वर्ल्ड हाॅकी लीग : भारतीय महिला पाचव्या स्थानी, अाॅलिम्पिकची संधी कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एटवर्प - राणी रामपालने भारतीय महिला संघाच्या अागामी रिअाे अाॅलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी कायम ठेवली. भारतीय संघाने शनिवारी एफअायएचच्या वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलमध्ये शानदार विजयाची नाेंद केली. भारताने सामन्यात जपानवर १-० ने मात केली. यासह भारतीय महिला स्पर्धेत पाचव्या स्थानावर राहिल्या.
राणी रामपालने (१३ मि.) केलेल्या गाेलच्या बळावर भारतीय महिलांनी रंगतदार सामना जिंकला. रितू राणीच्या नेतृत्वाखाली महिला टीम मैदानावर उतरली हाेती. या वेळी दमदार सुरुवात करून भारतीय महिला टीमने मजबूत पकड घेतली. राणी रामपालने सामन्याच्या १३ व्या मिनिटाला गाेलचे खाते उघडले. यासह भारताच्या महिला संघाने सामन्यात १-० ने अाघाडी घेतली.

कांस्यपदकासाठी भारत-इंग्लंड भिडणार
अाशियाई चॅम्पियन भारतीय पुरुष संघ एफअायएचच्या वर्ल्ड हाॅकी लीग सेमीफायनलमध्ये कांस्यपदक जिंकण्यासाठी सज्ज झाला अाहे. सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला रविवारी कांस्यपदकासाठी इंग्लंडच्या अाव्हानाला सामाेरे जावे लागेल. गत सामन्यातील पराभवामुळे भारताचा अंतिम फेरीतील प्रवेशाचा प्रयत्न अपयशी ठरला.