आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले, ऑलिम्पिकमध्ये झालेल्या पराभवाचा हिशेब चुकता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - रिओ ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतीय महिला संघाला ६-१ ने हरवले होते. आता भारतीय महिला हॉकी संघाने शानदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पहिल्या हॉकी कसोटीत १-० ने हरवले. भारताने या विजयासह रिओतील पराभवाचा हिशेब चुकता केला. भारताकडून विजयी गोल कर्णधार राणी रामपालने दुसऱ्या क्वार्टरमध्ये केला. आता दोन्ही संघांत येत्या २५ आणि २७ रोजी पुढचे दोन सामने होतील.

जागतिक क्रमवारीत १२ व्या क्रमांकावर असलेल्या भारताने चौथ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारताना यजमान संघाला रक्षात्मक खेळ करण्यास भाग पाडले. राणी रामपालने दुसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करून आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. मात्र, दोन्ही संघांकडून गोल होऊ शकला नाही. भारताच्या वंदना कटारियाला तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करण्याची चांगली संधी होती. मात्र तिला यश मिळाले नाही. ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्वार्टरमध्ये तीन पेनॉल्टी कॉर्नर मिळाले. मात्र याचा त्यांना फायदा घेता आला नाही.

भारतीय पुरुषांचा पराभव
मेलबर्न | चार देशांच्या निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा बुधवारी ऑस्ट्रेलियाकडून २-३ ने पराभव झाला. भारताकडून रूपिंदरपाल सिंगने २१ व्या आणि ५३ व्या मिनिटाला दोन गोल केले. ऑस्ट्रेलियाकडून जेरेमी हेवूडने २४ व्या, ३६ व्या तर ट्रेंट मिटनने ४३ व्या मिनिटाला गोल केला.
बातम्या आणखी आहेत...