आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक कुस्ती स्पर्धा : भारताचे तिन्ही मल्ल ठरले अपयशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास - रिओ आॅलिम्पिकमधील आपल्या प्रवेश निश्चितीच्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न अपयशी ठरला. जागतिक कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताची निराशाजनक सुरुवात झाली. भारताचे अव्वल तीन मल्ल सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे ६६, ७५ आणि ९८ किलाे वजन गटातील भारतीय संघाची पदकाची आशा मावळली.

गुरप्रीत सिंग (७५ कि.), हरदीप (९८ िक.) आणि दीपक (६६ कि.) हे तिघेही पहिल्या दिवशी समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. अमेरिकेच्या अँड्रयू थाॅमस बिसेकने भारताच्या गुरप्रीत सिंगला ६-४ अशा फरकाने पराभूत केले. तसेच ६६ किलाे वजन गटात भारताच्या दीपकला पराभवाचा सामना करावा लागला.

हरदीपचा प्री-क्वार्टरमध्ये पराभव
भारताचा युवा खेळाडू हरदीपने ९८ किलाे वजन गटात नशीब आजमावले. मात्र, त्याला प्री-क्वार्टरमध्ये पराभवाला सामाेरे जावे लागले. राेमानियाच्या अलीनने हरदीपचा ९-० ने पराभव केला. त्याने पहिल्या फेरीत उझबेकिस्तानच्या जहाेनगीरवर मात केली. यासह त्याने विजयी सलामी दिली हाेती.