आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Wrestling IPL Begin From 8 November In India

आता पाहा कुस्ती \"आयपीएल\'चा थरार, हे दिग्गज गाजवणार मैदानात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे दिग्गज घेणार कुस्ती आयपीएलमध्ये भाग. - Divya Marathi
हे दिग्गज घेणार कुस्ती आयपीएलमध्ये भाग.
क्रिकेट आयपीएलच्या धर्तीवर आता "कुस्ती आयपीएल'चा थरार सुरू झाला आहे. या लीग कडे "प्रो रेस्लिंग लीग' म्हणूनही पाहिले जात आहे. या मागची मुख्य भूमिका आहे, कुस्तीला प्रोत्साहन देणे आणि ऑलम्पिकसारख्या मोठमोठ्या स्पर्धांसाठी चांगले मल्ल तयार करणे. कुस्तीचा हा महाकुंभ 8 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
54 खेळाडू उतरतील मैदानात
कुस्तीला प्रोत्साहन आणि चालना देण्याच्या हेतूूने सुरू होत असलेल्या या, कुश्तीच्या महाकुंभात देशातील आणि परदेशातील खेळाडू भाग घेतील. यात साधारणपणे 54 खेळाडूंचा समावेश असेल, त्यात भारतातील 36 आणि परदेशातील 18 खेलाडूं असतील.
सहा संघांचा असेल समावेश
या लीगची रचनादेखील क्रिकेट आयपीएलनुसारच करण्यात आली आहे. यातही विविध फ्रेंचायजी असतील. या कुंभात देशातील, दिल्ली, मुंबई, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि बेंगळुरू या सहा संघांचा समावेश असेल. प्रत्येक संघात एकूण 9 खेळाडू असतील, या पैकी सहा खेळाडू भारतीय तर तीन खेळाडू परदेशी असतील. या 21 दिवसात एकूण 18 सामने होणार आहेत.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, हे भारतीय स्टार्स दाखवतील या 'टुर्णामेंटमध्ये जलवा'...