आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिओ: अवघ्या २ पदकांसह भारताचे अभियान संपले, वाचा झोळीत काय पडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिअो - कुस्तीमध्ये भारतासाठी पदकाचे आशास्थान असलेला मल्ल योगेश्वर दत्त क्वालिफिकेशन राउंडमध्ये पराभूत झाला. ६५ किलो वजन गटात त्याला मंगोलियाचा मल्ल मंदाखनारन गांजोरिगने ३-० ने हरवले. पहिल्या सामन्यात योगेश्वर दत्त पराभूत झाल्याने भारतीय गटात निराशा पसरली.
मात्र, योगेश्वरला रिपचेजमध्ये संधी मिळते का याकडे सर्वांचे लक्ष होते. पुढे क्वार्टर फायनलमध्ये योगेश्वरला हरवणारा मंगोलियाचा मल्ल रशियन मल्लाकडून हरल्याने योगेश्वर स्पर्धेबाहेर झाला. यासह कुस्तीमध्ये साक्षी मलिकच्या एकमेव कांस्यपदकासह रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे कुस्तीतील अभियान संपुष्टात आले. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीत दोन पदके जिंकली होती. लंडनमध्ये योगेश्वरने कांस्यपदक, तर सुशीलकुमारने रौप्यपदक जिंकले होते. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या मंगोलियाचा मल्ल गांजोरिगविरुद्ध योगेश्वर एकही डाव टाकू शकला नाही. मंगोलियाच्या मल्लाने योगेश्वरला एकही संधी दिली नाही. योगेश्वर एकदाही आक्रमक खेळला नाही. उलट तोच मंगोलियाच्या मल्लाकडून मैदानावर पडला. योगेश्वरचा संथ आणि रक्षात्मक खेळ अंगलट आला.
१२ वर्षांत पहिल्यांदा पुरुष खेळाडू अपयशी
भारतीय संघातील पुरुष खेळाडू तब्बल १२ वर्षांनंतर अाॅलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकला नाही असे हे पहिल्यांदा, यापूर्वी २००० सिडनी अाॅलिम्पिकमध्ये घडले हाेते. त्या अाॅलिम्पिकमध्ये महिला वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरीने एकमेव पदक जिंकले हाेते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, १५ खेळ, ७० प्रकारात भारताच्‍या झोळीत काय पडले..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...