आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indonesia Open Badminton: Saina, P.Kashyap Entered Second Round

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा: सायना, पी. कश्यप पुढच्या फेरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - जगातली नंबर वन बॅडमिंटनपटू भारताची सायना नेहवाल आणि पुरुषांत परुपल्ली कश्यप यांनी आपापले सामने जिंकून येथे सुरू असलेल्या ८ लक्ष डॉलर बक्षीस रक्कम असलेल्या इंडोनेशिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, भारताची युवा खेळाडू पी. व्ही. सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला.

दुसरी मानांकित सायनाने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या निचाओन जिंदापोन हिला अवघ्या ३५ मिनिटांत सरळ गेममध्ये २१-१६, २१-१८ ने हरवले. पुरुष गटात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता खेळाडू पी. कश्यपने थायलंडच्या तानोंगसाक साएनसोमबुनसुक याला २९ मिनिटांत २१-१७, २१-७ ने पराभूत करताना पहिला सामना जिंकला. असे असले तरीही विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळेसची कांस्यपदक विजेती सिंधूला पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला. सिंधूला चिनी तैयपैच्या सू या चिंग हिने तीन गेममध्ये जोरदार संघर्षानंतर ४९ मिनिटांत १६-२१, २१-१५, २१-१४ ने हरवले. भारतीय खेळाडूंत प्रणव जेरी चोप्रा आणि अक्षय देवाळकर या भारतीय पुरुष दुहेरी जोडीने कॅनडाचा आंद्रियन लियू आणि डॅरिक एनजी यांना ३५ मिनिटांत २१-१७, २२-२० ने हरवले.