आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indonesia Open Badmiton: Saina, Shrikant Give Challenge In Jakarta

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सायना, श्रीकांत जकार्तात आव्हान देणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - जागतिक क्रमवारीची नंबर वन खेळाडू सायना नेहवाल आणि वर्ल्ड नंबर चार खेळाडू के. श्रीकांत आता इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आपले आव्हान सादर करतील. सायनाचा पहिला सामना स्पर्धेच्या दुस-या दिवशी बुधवारी होईल. स्पर्धेत तिला दुसरे, तर चीनच्या जुई रुई ली हिला अव्वल मानांकन देण्यात आले आहे.

सायनाने येथे २००९, २०१० आणि २०१२ मध्ये इंडोनेशिया ओपनचे विजेतेपद पटकावले होते. या वर्षी दोन किताब जिंकून सायना भन्नाट फॉर्मात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभाग घेतला होता. मात्र, तिला विजेतेपद मिळवता आले नाही. तिला पाचवी मानांकित चीनच्या शिजियान वांगने हरवले होते. इंडोनेशिया ओपनमध्ये सायनाला पुन्हा त्याच खेळाडूंचा सामना करावा लागेल, ज्यांच्याशी ती ऑस्ट्रेलियात लढली होती.

स्पर्धेत भारताची पी. व्ही. सिंधूसुद्धा आपले आव्हान सादर करेल. विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा कांस्यपदक विजेती सिंधू ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये दुस-या फेरीच्या पुढे जाऊ शकली नव्हती. मात्र, जकार्ता येथे सायना आणि पी. व्ही. सिंधू यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे.
के. श्रीकांतकडून आशा
पुरुष गटात चीनच्या चेन लोंगने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून आपला फॉर्म सिद्ध केला होता. त्यालाच यंदा अव्वल मानांकन आहे. पुरुष गटात भारताचा पी. कश्यप असला, तरीही तो सध्या फॉर्म आणि फिटनेसशी संघर्ष करत आहे. मात्र, युवा खेळाडू के. श्रीकांत धक्कादायक निकाल मिळवू शकतो. श्रीकांत लयीत आहे. महिला दुहेरीत भारताची मदार पुन्हा एकदा अनुभवी जोडी ज्वाला आणि पोनप्पा यांच्यावर असेल.मी चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करेल. येथे खेळताना मला खूप चांगला अनुभव येतो. ही माझी फेव्हरेट स्पर्धा आहे.
- सायना नेहवाल.