आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडाेनेशिया अाेपन: कश्यप उपांत्य फेरीत; सायनाचे अाव्हान संपुष्टात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पी. कश्यप - Divya Marathi
पी. कश्यप
जकार्ता - जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या पी.कश्यपने इंडाेनेशिया अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन चॅम्पियनशिपची उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या सायना नेहवालचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. तिला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. अाता भारतीय संघाची मदार युवा खेळाडू पी.कश्यपवर असेल. त्याच्याकडून पुरुष एकेरीत जेतेपदाची अाशा अाहे. सिंधूपाठाेपाठ अाता सायना नेहवालही स्पर्धेतून बाहेर पडली अाहे. याशिवाय के. श्रीकांतलाही स्पर्धेतील अापले अाव्हान फार काळ कायम ठेवता अाले नाही.

कश्यप ६३ मिनिटांत विजयी
भारताच्या पी.कश्यपने शानदार कामगिरी करताना जगातील नंबर वन चीनच्या चेन लाेंगवर मात केली. त्याने अाक्रमक खेळी करून पुरुष उपांत्यपूर्व सामन्यात १४-२१, २१-१७, २१-१४ अशा फरकाने राेमहर्षक विजयाची नाेंद केली. त्याने शर्थीची झुंज देताना ६३ मिनिटांमध्ये शानदार विजय साकारला. यासह त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम चारमध्ये प्रवेश केला. यासाठी त्याला तीन गेमपर्यंत झुंज द्यावी लागली. त्याने पहिल्या गेममधील अपयशाला दूर सारून सामना अापल्या नावे केला. चीनच्या अव्वल मानांकित लाेंगने दमदार सुरुवात करताना पहिल्या गेममध्ये २१-१४ ने जिंकून सामन्यात अाघाडी घेतली.या वेळी कश्यपने दमदार पुनरागमन केले. त्याने चीनच्या खेळाडूला राेखून दुसरा गेम जिंकला. यासह त्याने बराेबरी साधली. त्यानंतर तिस-या निर्णायक सेटमध्ये दाेन्ही खेळाडूंमध्ये झुंज रंगली हाेती.

सायनाची झुंज अपयशी
जगातील माजी नंबर वन सायना नेहवालने उपांत्यपूर्व सामन्यात विजयासाठी दिलेली १ तास १० मिनिटांची झुंज अपयशी ठरली. तिला महिला एकेरीच्या अंतिम अाठमधील सामन्यात पाचव्या मानांकित शिजियान वांगने पराभूत केले. चीनच्या वांगने रंगतदार सामन्यात १६-२१, २१-१२, २१-१८ नेे विजय संपादन केला. यासह तिने उपांत्य फेरी गाठली. पराभवासह सायनाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. तिला वांगने सलग दुस-यांदा पराभूत केले.