आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indonesia Open Super Series: Saina,P.Kashyap Entered In Semifinal

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडाेनेशिया अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत सायना, पी. कश्यप उपांत्यपूर्व फेरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या सायना नेहवाल अाणि राष्ट्रकुल चॅम्पियन पी. कश्यपने विजयी माेहीम अबाधित ठेवताना इंडाेनेशिया अाेपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे चाैथ्या मानांकित के. श्रीकांत, ज्वाला गुट्टा अाणि अश्विनी पाेनप्पाचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. यासह भारताचे हे तिन्ही खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले.

पुरुष एकेरीत १२ व्या मानांकित पी. कश्यपने अापली विजयाची लय कायम ठेवली. त्याने एकेरीच्या सामन्यात दक्षिण काेरियाच्या साेन वान हाेचा पराभव केला. त्याने २१-११, २१-१४ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. जागतिक क्रमवारीत चाैथ्या स्थानावर असलेल्या पी. कश्यपने अवघ्या ३६ मिनिटांमध्ये सामना जिंकला. यासह त्याने अंतिम अाठमधील अापला प्रवेश निश्चित केला. यासाठी त्याला फार काळ झुंज द्यावी लागली नाही. सरस खेळी करताना त्याने सहज विजय साकारला. पराभवासह काेरियाच्या खेळाडूचे अाव्हान संपुष्टात अाले.

श्रीकांत, ज्वाला-अश्विनी हरले
श्रीकांतला पुरुष एकेरीत यजमान इंडाेनेशियाच्या गिटिंग अॅथाेनीने पराभूत केले. त्याने ५४ मिनिटांत घरच्या मैदानावर १४-२१, २२-२, २१-१३ ने विजय मिळवला. दुसरीकडे महिला दुहेरीत ज्वाला अाणि अश्विनीला सातव्या मानांकित यु यांग-झाेंग कियानशिनने पराभूत केले. या जाेडीने २९ मिनिटांत २१-८, २१-१८ ने सामना जिंकला.

सायना ३७ मिनिटांमध्ये विजयी
दुस-या मानांकित सायनाने ३७ मिनिटांमध्ये महिला एकेरीच्या अंतिम अाठमध्ये धडक मारली. तिने चीन तैपईच्या सू या चिंगला सरळ दाेन गेममध्ये धूळ चारली. भारताच्या खेळाडूने २१-१३, २१-१५ अशा फरकाने शानदार विजय संपादन केला. अाता तिचा सामना चीनच्या शिजियान वांगशी हाेणार अाहे.

अक्षय-प्रणव पराभूत
पुुरुष दुहेरीत अक्षय देवालकर अाणि प्रणव चाेप्राला पाचव्या मानांकित चाई बियाअाे अाणि हाेंग वेईने धूळ चारली. पाचव्या मानांकित जाेडीने २१-१३, २१-११ ने विजय मिळवला.