आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोळाफेकीत भारताच्या इंद्रजितला सुवर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वुहान - भारताचा युवा खेळाडू इंद्रजित सिंगने दमदार प्रदर्शन करताना चीनच्या वुहान येथे सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिरंगा फडकवला. इंद्रजितने येथे सुरू असलेल्या स्पर्धेच्या गोळाफेकीत सुवर्णपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला.

इंद्रजितने नवा स्पर्धा विक्रम करताना २०.४१ मी. इतके अंतर दूर गोळा फेकून सोन्यावर आपले नाव कोरले. याच इंद्रजितने २०११ मध्ये झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये रौप्यपदक तर मागच्या वर्षी इंचियोन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. या वेळी त्याने सोनेरी यश मिळवले.

चीन-तैपेईच्या चांग मिंग-हुंगने १९.५६ मीटरच्या अंतरासह रौप्यपदक, तर चीनच्या टियान झिझोंगने १९.२५ मीटर अंतरासह कांस्यपदक मिळवले.

हरियाणाच्या या २७ वर्षीय डावखु-या खेळाडूने मागच्या वर्षीच रिओ ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते. इंद्रजित भारताचा आठवा गोळाफेकपटू ठरला आहे, ज्याने आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले. यापूर्वी अशी कामगिरी जगराज सिंग (१९७३), बहादूर सिंग (१९७५), बलविंदर सिंग (१९८५ आणि १९८९), शक्तीसिंग (२०००), नवप्रीतसिंग (२००७) आणि प्रकाश सिंग करहाणा (२००९) यांनी केली आहे.