आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाटे 4 पासून खायला सुरुवात करतो \'ROCK\', अशी मेन्टेन करतो BODY

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- व्यावसायिक कुस्तीच्या जगतामध्ये एकेकाळी रॉकचा बोलबाला होता. कितीही मोठा पहिलवान असला तरी रॉक त्याला काही मिनिटांमध्ये चित करण्यात पटाईत होता. मग समोर अंडरटेकर असो अथवा ट्रिपल एच. अनेकवेळ त्याला पराभवाचे तोंडही पाहावे लागले. पण जोपर्यंत तो लढला तोपर्यंत विजेत्याप्रमाणेच लढला. त्यानंतर अचानक त्याने रेसलिंगला रामराम करत हॉलीवूडमध्ये एंट्री घेतली. हॉलीवूडमध्ये रॉकला ड्वेन जॉनशन नावाने ओळखले जाते.
 
चित्रपटांमध्ये आल्यानंतरही रॉकने व्यायाम आणि पिळदार शरिराकडे दुर्लक्ष केलेले नाही. 49 व्या वर्षीही हा सुपरस्टार आपल्या हेल्थबाबत सतर्क आहे. 6 फूट 4 इंच उंचीच्या रॉकचे वजन 122 किलो आहे. ते मेंटेन करण्यासाठी त्याला तासनतास जिममध्ये घाम गाळावा लागतो. तसेच त्याला खाण्यापिण्यावरही लक्ष ठेवावे लागते. एक सामान्य व्यक्ती वर्षाकाठी खाण्या पिण्यावर जास्तीत जास्त 1,59,278 रुपये खर्च करतो. पण रॉक केवळ मासे खाण्यावरच 89,196 रुपये खर्च करतो.
 
पहाटे 4 पासून खायला सुरुवात-
 
नुकत्याच एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रॉकने सांगितले होते की, सकाळी 4 पासूनच तो खायला सुरुवात करतो. दिवसभरात तो 7 वेळा जेवण करतो. यात अंडी, चिकन, भात, मासे यांचा समावेश असतो. त्यानंतर तो अनेक तास व्यायाम करतो. आजही शाळेत होतो त्याच साईजची म्हणजे 30 मापाची जिन्स वापरतो असे त्याने सांगितले.
 
जेवणाचा मेन्यू...
 
Meal 1 - 250 ग्रॅम मासे, 2 अंडी, 2 कप दलिया
Meal 2 - 225 ग्रॅम मासे, 340 ग्रॅम बटाटे, 1 वाटी भाजी
Meal 3 - 225 ग्रॅम चिकन, 2 वाट्या भात, 1 वाटी भाजी
Meal 4 - 225 ग्रॅम मासे, 2 वाट्या भात, 1 वाटी भाजी, 1 मोठा चमचा माशाचे तेल
Meal 5 - 225 ग्राम मांस, 340 ग्रॅम उकडलले बटाटे, पालखाचे सॅलेड
Meal 6 - 250 ग्रॅम मासे, 2 वाट्या तांदूळ, सॅलेड
Meal 7 - 30 ग्रॅम कॅसीन प्रोटीन, 10 अंड्यांचे ऑमलेट, 1 वाटी भाजी (कांदा, मिरची, मशरूम), 1 मोठा चमचा ओमेगा, 3 माशांचे तेल
 
पुढील स्लाईड्सवरून जाणून घ्या रॉकचा Diet Plan
बातम्या आणखी आहेत...