आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमी विजेतेपदानंतरही 4th बेस्ट प्लेयर आहे फेडरर, TOP-3 मध्ये महिलाच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- स्विर्त्झलँडचा टेनिस स्टार रॉजर फेडररने रविवारी 8 व्यांदा विंबल्डनचा किताब जिंकला. या वर्षातील त्याचे हे तिसरे ग्रॅंड स्लॅम टायटल आहे. सध्या फेडररच्या नावावर 19 ग्रॅंड स्लॅम टायटल आहेत. विंबल्डनमध्ये त्याने पीट सॅम्प्रास आणि विलियम्स रेनशॉचा विक्रम मोडित काढला. या दोघांनी आतापर्यंत 7-7 वेळा विंबल्डन जिंकले होते. फेडररने यावर्षी सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले तर आता विंबल्डनमध्ये यंदाचे दूसरे ग्रॅंड स्लॅम जिंकले आहे. काय असते ग्रॅंडस्लॅम....
 
- टेनिसमधील चार मोठ्या टूर्नामेंटला ग्रॅंड स्लॅम म्हटले जाते. यात ऑस्ट्रेलियन ओपन ( दरवर्षी जानेवारीत होते), फ्रेंच ओपन ( दरवर्षी मे किंवा जून), विंबल्डन (जून किंवा जुलै) आणि यूएस ओपन (ऑगस्ट किंवा सप्टेंबर)चा समावेश आहे. या टूर्नामेंट्समधूनच खेळाडूला सर्वात जास्त रॅंकिंग प्वाईंट, प्राईज मनी, मीडिया कव्हरेज, पॉपुलॅरिटी मिळते. प्रत्येक टूर्नामेंट सुमारे 2 आठवडे चालते. 
- ऑस्ट्रेलियन आणि यूएस ओपन हार्ड कोर्टवर खेळली जाते. फ्रेंच ओपन क्ले कोर्टावर तर विंबल्डन ग्रास कोर्टावर खेळली जाते. यातील विंबल्डन टुर्नामेंट सर्वात जुनी आहे. याची सुरुवात 1877 मध्ये झाली होती. 
 
सानिया मिर्झाच्या नावावर 6 ग्रॅंडस्लॅम-
 
- भारताची नंबर वन टेनिस स्टार सानिया मिर्झाने आपल्या करियरमध्ये आतापर्यंत 6 ग्रॅंड स्लॅम टायटल जिंकली आहेत. मात्र, ही सर्व डबल्समधील आहेत. सानियाने डबल्समध्ये 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विंबल्डन आणि यूएस ओपन जिंकले होते. मिक्स्ड डबल्समध्ये तिने 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये यूएस ओपन जिंकले होते. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सर्वात जास्त ग्रॅंडस्लॅम टायटल जिंकणारे टेनिस स्टार्स....
बातम्या आणखी आहेत...