आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coach Said, Injuries Affecting Performance Of Saina Nehwal

सायनाच्या कामगिरीवर दुखापतीचा प्रभाव, दुखापतीमुळे सध्या सराव बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दुखापतीमुळे जगातली नंबर दोन आणि भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या कामगिरीवर प्रभाव पडला आहे, असे मत तिचे कोच विमलकुमार यांनी व्यक्त केले. विश्व स्पर्धेपासून सायना सलग दुखापतीमुळे त्रस्त आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य जिंकणाऱ्या सायनाने डिसेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड सुपर लीगच्या आधी सर्व स्पर्धेत सहभाग घेतला. यामुळे तिची रँकिंग कायम आहे. विमलकुमार म्हणाले, "सायना योग्य उपचार घेत आहे. मात्र, तिचे शेड्यूल खूप व्यग्र आहे. गेल्या काही आठवड्यांपासून तर तिला सरावही करता आलेला नाही. रँकिंग कायम ठेवण्यासाठी तिने स्वत:वर दबाव निर्माण केला आहे, असे मला वाटते. मी यामुळे थोडा चिंतेत आहे. रिअोपर्यंत तिला फिट ठेवणे माझे काम आहे.'
सायनाचे कोच विमल पुढे म्हणाले, "विश्व स्पर्धेदरम्यान तिला खूप वेदना होत होत्या. यानंतरही ती खेळली. तिच्या शरीरच्या काही भागावर सूजही आहे. यामुळे ती थोडी त्रस्त आहे. जपानमध्ये आम्हाला हे समजले. यानंतर भारतात येताच आम्ही लगेचच एमआरआय केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिची सूज लवकरच ठीक होईल.'