आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Injury Concerns May Force Sushil Kumar To Pull Out Of Pro Wrestling League: Report

प्रो-रेसलिंग:आजपासून देशी, विदेशी मल्लांचा थरार रंगणार, सुशीलकुमार जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रो-रेसलिंग अर्थात कुस्ती लीग गुरुवारपासून देशाची राजधानी दिल्लीत सुरु होत आहे. दिल्ली वीर व पंजाब रॉयल्सदरम्यान सलामीची लढत होणार आहे. स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले आहेत. भारताचे 30 आणि विदेशातील 24 मल्ल स्पर्धेत आपले नशीब आजमावतील. मात्र, भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे तो लीगमधून माघार घेण्याची शक्यता आहे.

एका इंग्रजी न्यूज वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सुशीलकुमारचे कोच सतपाल यांनी सांगितले की, सुशिलकुमार जखमी असून त्याला कुस्ती लीगमध्ये उतरण्याचा सल्ला देऊ शकत नाही. कार तो या स्पर्धेसाठी फीट जाली. पुढील वर्षात अर्थात 2016 मध्ये रियो ऑलिम्पिक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुशिलकुमारने विश्रांती घेण्याची गरज आहे. रियो ऑलिम्पिकपर्यंत त्याला त्याला फीट होणे आवश्यक आहे.
दरम्यान, लीगची फायनल याच महिन्यात 27 डिसेंबरला होईल. विजेत्या संघाला15 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.या स्पर्धेत सहा फ्रँचायझी टीम खेळतील. हे सहा संघ नवी दिल्ली, पंजाब, मुंबई, हरियाणा, बंगळुरू आणि उत्तर प्रदेश आहेत, असे स्पर्धेचे संचालक विशाल गुरनानी यांनी सांगितले. प्रत्येक शहरात एक सत्र होईल. हे तीन दिवसांचे असेल. कुस्तीप्रेमींचा स्पर्धेला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून तिकिटांची मोठ्या संख्येने विक्री होत आहे, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स चॅनलवर रोज होईल. या स्पर्धेचा आनंद तब्बल 60 देशांचे चाहते लुटू शकतील.

आजचे आकर्षण
> दिल्ली वीर : नवरुजोवइख्तियोर (उज्बेकिस्तान), पेट्रिसविली जेने (जॉर्जिया), सोफिया मॅटिसन (स्वीडन महिला) आणि विनेश फोगट (भारत, महिला).

>पंजाब रॉयल्स : ब्लादिमीर (जॉर्जिया), जर्गलसेखन (मंगोलिया), फ्रेडरिका पीटरसन (मंगोलिया महिला), वेसिलिसा (बेलारुस).

फ्रँचायझी टीमची नावे
दिल्लीवीर, हरियाणा हॅमर्स, पंजाब रॉयल्स, यूपी वॉरियर्स, बंगळुरू योद्धाज, मुंबई गरुड.

रोहित शर्मा कुस्ती संघाचा सहमालक
देशात पहिल्यांदा होत असलेल्या प्रो कुस्ती लीगमध्ये क्रिकेटपटू रोहित शर्मा उत्तर प्रदेश वॉरियर्सचा सहमालक बनला आहे. कुस्तीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रोहित म्हणाला. बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्रनंतर प्रो कुस्ती लीगशी जुळणारा रोहित शर्मा दुसरा मोठा सेलिब्रिटी आहे.

येथे होतील सामने
10 ते 12 डिसेंबर, के. डी. जाधव, इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली.
13 ते 15 डिसेंबर, गुरुनानक इनडोअर स्टेडियम, लुधियाना.
16 ते 18 डिसेंबर, हयात रिजेंसी, गुडगाव.
21 ते 22 डिसेंबर, रिलायन्स स्टुडिओ, फिल्म सिटी, मुंबई.
23 ते 24 डिसेंबर, कोटामनगला स्टेडियम, बंगळुरू.
25 ते 26 डिसेंबर, सेमी आणि फायनल, दिल्ली.
फायदा होईल
कुस्ती लीग स्पर्धेच्या आयोजनाने देशात नव्या अध्यायाला सुरुवात होत आहे. या स्पर्धेमुळे कुस्तीत आणखी वाढ होईल लोकप्रियता वाढेल. युवा खेळाडू आकर्षित होतील. या खेळात करिअरही होऊ शकते, हे लीगद्वारे सिद्ध होईल. मी स्पर्धेत खेळण्यासाठी आतुर आहे.
- सुशीलकुमार.
बातम्या आणखी आहेत...