आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल 10 ची बोली प्रक्रिया 20 फेब्रुवारी रोजी बंगळुरूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - येत्या ३ एप्रिलपासून आयपीएल-१० चा धुमधडाका सुरू होईल. या लीगच्या आधी २० फेब्रुवारी रोजी ३५१ खेळाडूंची बोली प्रक्रिया पार पडेल. या खेळाडूंत १२२ खेळाडू आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले आहेत. या वेळी बोलीत सहा असोसिएट देशांचे खेळाडूसुद्धा सामील आहेत. या वेळी आयपीएलसाठी ७९९ खेळाडूंनी आपले रजिस्ट्रेशन केले आहे.  
 
आयपीएलच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार खेळाडूंचे करार या सत्रात संपुष्टात येतील. यामुळे २०१८ सत्राच्या आधी या वेळी बोली प्रक्रियेत मोठ्या संख्येने खेळाडू सामील झाले आहेत. याशिवाय रिटेंशन पॉलिसी आणि २०१८ मध्ये संघांच्या संख्येवरसुद्धा आयपीएल संचालन परिषदेचे चित्र स्पष्ट नाही. कारण पुढच्या वेळी निलंबनानंतर चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्थान रॉयल्स पुनरागमन करतील. 
  
असोसिएट संघांच्या या सहा खेळाडूंवर लागेल बोली:  असगर स्तानिकजई, मोहंमद नबी, मोहंमद शहजाद, रशीद खान, दौलत जादरान (सर्व अफगाण). चिराग सुरी. (यूएई).  
सुदीप त्यागी बाहेर:  भारताच्या २४ खेळाडूंपैकी चार वनडे खेळलेला वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी एकमेव खेळाडू आहे, ज्याला बाहेर करण्यात आले.  

इंग्लंडच्या खेळाडूंत रस:  काही फ्रँचाइझीचे या वेळी बोली प्रक्रियेत इंग्लंडच्या खेळाडूंवर विशेष लक्ष आहे. यात इयान मोर्गन, बेन स्टोक्स, क्रिस वोग्सचा समावेश असून यांचे आधारमूल्य २ कोटी रुपये आहे. ईशांत शर्मा, मिशेल स्टार्क, अँजेलो मॅथ्यूजचे आधारमूल्यसुद्धा २ कोटी रुपये आहे. 
 
एकूण संघ : ८   
{ संघांचे नाव : मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात लॉयन्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, किंग्ज इलेव्हन पंजाब.  
{ संघांचे कर्णधार : महेंद्रसिंग धोनी (पुणे), विराट कोहली (बंगळुरू), गौतम गंभीर (केकेआर), जहीर खान (दिल्ली), रोहित शर्मा (मुंबई), डेव्हिड मिलर (पंजाब), सुरेश रैना (गुजरात), डेव्हिड वॉर्नर (हैदराबाद).
 
आयपीएल-१० एक दृष्टिक्षेप   
{ उदघाटन : ५ एप्रिल  
{ पहिला सामना : केकेआर-दिल्ली डेअरडेव्हिल्स (कोलकाता).  
{ फायनल : २६ मे कोलकाता.  
बातम्या आणखी आहेत...