आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPL 2017 Match 46, Live Cricket Score Royal Challengers Vs Kolkata Knight Riders In Bengaluru

कोलकात्याची बंगळुरूवर मात; नरेनचे 15 चेंडूंत अर्धशतक; KKR पुन्हा दुसऱ्या स्थानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- वेस्ट इंडीजचा जादुई गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे, त्या सुनील नरेनने फलंदाजीत दम दाखवताना अवघ्या १५ चेंडूंत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला. त्याच्याशिवाय दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या क्रिस लिनने २२ चेंडूंत ५० धावा काढल्या. या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६ विकेटने हरवले. 

सुनील नरेनने अवघ्या १५ चेंडूंत अर्धशतक ठोकून आयपीएलमध्ये सर्वांत वेगवान ५० धावा काढण्याच्या युसूफ पठाणच्या विक्रमाची बरोबरी केली. नरेनने १७ चेंडूंत ४ षटकार, ६ चौकारांसह ५४ धावा काढल्या. सलामीवीरांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर केकेआरने गुणतालिकेतील तळाचा संघ आरसीबीला एकतर्फी धुतले. केकेआरने २९ चेंडू शिल्लक ठेवून १५९ धावांचे लक्ष्य गाठत गुणतालिकेत पुन्हा दुसरे स्थान मिळवले आहे.

पॉवर प्लेमध्ये १०५ धावांचा विक्रम
केकेआरच्या सलामीवीरांनी ६ षटकांच्या पॉवर प्लेमध्ये १०५ धावा ठोकल्या. हा आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. मागचा विक्रम चेन्नई सुपरकिंग्जच्या नावे होता. चेन्नईने २०१४ मध्ये पंजाबविरुद्ध ६ षटकांत २ बाद १०० धावा ठोकल्या होत्या. फक्त या दोन सामन्यातच पॉवर प्लेमध्ये १०० पेक्षा अधिक धावा झाल्या.

कोहली, गेल, एबी पुन्हा अपयशी 
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून विराट कोहली (५), क्रिस गेल (०) आणि ए.बी.डिव्हिलर्स (१०) हे तिघे पुन्हा अपयशी ठरले. या सामन्यात तिघांनी मिळून केवळ १५ धावा काढल्या. यानंतर आरसीबीने मनदीपसिंग (५२) आणि ट्रेव्हिस हेडच्या (७५) अर्धशतकाच्या बळावर दीडशे धावांचा टप्पा ओलांडला. आरसीबीने २० षटकांत ६ बाद १५८ धावा काढल्या. केकेआरकडून उमेश यादवने ३ गडी बाद केले. सुनील नरेनने दोघांना बाद केले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळरूचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर झाला आहे. आरसीबीची टीम गुणतालिकेत १३ सामन्यांत १० पराभवासह तळाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...