आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडिल विकायचे कॅसेट, आज मुलगा IPL टीमचा मालक, अशी आहे रॉयल LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केशव बंसल - Divya Marathi
केशव बंसल
स्पोर्ट्स डेस्क- आयपीएल 10 ची सर्वात बॅलन्स्ड टीम गुजरात लायन्स टीम आपला दुसरा सीजन खेळत आहे. पहिल्या सीजनमध्येच गुजरातची टीम नंबर 1 होती. या टीमचे ओनर आहेत व इंटेक्सचे डायरेक्टर केशव बंसल.  ते आयपीएल टीम खरेदी करणारे सर्वात कमी वयाचे बिजनेसमॅन आहेत. केशवचे वडिल कधी काळी ऑडियो कॅसेट विकायचे. मात्र, आज त्यांचा मुलगा कोट्यावधी रूपयांच्या आयपीएल टीमचे मालक आहेत. असे आहे फॅमिली बॅकग्राउंड...
 
- बंसल परिवार राजस्थानमधील आहे. केशवचे आजोबा भंवरलाल कांद्याचे व्यापारी आहेत. 
- केशवचे वडिल नरेंद्र अनेक वर्षे नेपाळमध्ये राहिले. 1980 मध्ये त्यांचे कुंटुंब नेपाळमधून दिल्लीत शिफ्ट झाले होते. 
- नरेंद्र यांनी दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले आणि पुढे त्यांनी ऑडियो कॅसेट विक्रीचा व्यवसाय सुरु केला. 
 
अशी बनवली करोडोची कंपनी-
 
- नरेंद्र बंसल होलसेलमध्ये कॅसेट खरेदी करायचे आणि दिल्लीत छोट्या -छोट्या रीटेलर्सला विकायचे. 
- 80 च्या दशकात ते इलेक्ट्रॉनिक्सच्या उद्योगात पडले आणि कम्प्यूटर फ्लॉपीचे काम करू लागले. 
- त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायासाठी एजंट म्हणून हाँगकाँगमध्ये जाऊन फ्लॉपीचे काम सुरू केले.
- 1994 मध्ये 20 हजार रुपयांच्या भांडवलावर त्यांनी कंप्यूटर असेम्बलिंगचे काम इंटेक्स टेक्नोलॉजी नावाने सुरु केले. 
- 10 वर्षानंतर त्यांची स्वत:ची कंपनी इलेक्टॉनिक प्रॉडक्ट बनवू लागली. 
- एमबीए शिक्षित केशव नंतर वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागला. 
-19 व्या वर्षी कंपनीचे लॉजिस्टिक विभाग सांभाळण्यापासून त्याने सुरुवात केली आणि नंतर मार्केटिंगमध्ये उतरला. मागील 3 वर्षांत त्याने कंपनीच्या 20 जाहिराती बनवल्या आहेत.
 
संघाचे नाव गुजरात लायन्स का ठेवले?
 
- केशवने मागच्या वर्षी संघाच्या लिलावापूर्वी संघ प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयशी चर्चा केली होती. यातूनच गुजरात लायन्सचा संघ तयार झाला. 
- केशवच्या आई अल्पा मूळच्या राजकोटच्या असणे हेसुद्धा गुजरात लायन्सच्या निवडीमागचे एक कारण आहे. 
- आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही मोबाइल ब्रँड नव्हते, परंतु केशवने इंटेक्सच्या रूपात तो दिला. 
- रिलायन्सनेही ४ जीसाठी इंटेक्स हँडसेटची निवड केली आहे. केशवला अभिनयाचाही छंद आहे. मात्र, आतापर्यंत त्याने चित्रपटांत भूमिका साकारली नाही. इंटेक्स कंपनीच्या जाहिरातीत तो असतो.
 
केशव बन्सलचा संक्षिप्‍त परिचय-

-  वय : 24 वर्षे
- वडील : नरेंद्र बन्सल, आई : अल्पा, बहीण-ईशिता
- शिक्षण :वसंतकुंजच्या द हेरिटेज स्कूलमधून शिक्षण, नवी दिल्लीच्या आयआयएलएममधून व्यवस्थापनाचे शिक्षण, मँचेस्टर स्कूल ऑफ बिझनेसमधून वर्षभराचा अभ्यासक्रम.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, केशव बंसलच्या रॉयल लाईफचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...