आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • IPTL 2: Singapore Slammers Beat Philippines Mavericks 30 22 On Day 2 Of India Leg

आयपीटीएल : सिंगापूरने ३०-२२ ने जिंकला सामना, फिलिपाइन्स पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीगमध्ये (अायपीटीएल) शुक्रवारी सिंगापूर स्मॅशर्स संघाने धडाकेबाज विजयाची नोंद केली. या संघाने सामन्यात फिलिपाइन्स मैवरिक्सचा ३०-२२ अशा फरकाने पराभव केला. सिंगापूर टीमचा लीगमधील हा तिसरा विजय ठरला. या टीमने पाचही सेट जिंकून सामना अापल्या नावे केला.

नवी दिल्लीच्या अायजी इंडाेर स्टेडियमवर या सामन्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. कार्लाेस माेयाने ३२ मिनिटांमध्ये मार्क फिलिपाेसिसवर ६-४ ने मात करून सिंगापूरला अाघाडी मिळवून दिली. त्यानंतर मिश्र दुहेरीत डस्टिन ब्राऊन अाणि कॅराेलिनाने सामना जिंकून अाघाडी कायम ठेवली हाेती. त्यानंतर सामने जिंकून सिंगापूरने विजय मिळवला.
इंडियन अॅसेसचा विजय : दुहेरीची जगातील नंबर वन सानिया मिर्झाने इंडियन अॅसेसला शुक्रवारी शानदार विजय मिळवून दिला. या टीमने जपान वाॅरियर्सला २६-२१ अशा फरकाने धुळ चारली.सानियाने अापल्याच देशाचा जाेडीदार राेहन बाेपन्नासाेबत मिश्र दुहेरीचा सामना जिंकला. त्यानंतर डब्ल्यूटीएची चॅम्पियन अग्निजस्का रादांवास्काने महिला एकेरीचा सामना जिंकून इंडियन अॅसेसचा शानदार विजय निश्चित केला.