आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीटीएलचे दिल्ली सत्र आजपासून रंगणार, लीगमध्ये इंडियन एसेस टॉपवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्टार खेळाडूंनी सजलेली इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीग (आयपीटीएल) स्पर्धेच्या दिल्ली सत्राला १० डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत राफेल नदाल, रॉजर फेडरर स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहेत. या स्पर्धेत या दोन दिग्गजांसह मरिन सिलिच, एग्निजस्का रदावांस्का, अॅना इवानोविक, मिलोस राओनिक, टॉमस बर्डिच, निक किर्गियोससारखे जगातले अव्वल टेनिसपटू खेळतील.

स्पर्धेतील दिल्ली सत्राचे सामने १२ डिसेंबरपर्यंत आयजीआय स्टेडियमवर खेळवले जातील. इंडियन एसेस या वेळी आयपीटीएलच्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे. यात जगातली दुहेरीची अव्वल क्रमांकाची खेळाडू सानिया मिर्झा, रोहन बोपन्ना, नदाल आणि रदावांस्का आहेत. २९ वर्षीय नदाल पहिल्यांदा या स्पर्धेत खेळत आहे. फेडरर आणि नदाल यांच्यातील सामन्यावर सर्वांचे लक्ष असेल.
लीगची गुणतालिका
क्रम टीम सामने विजय पराभव
१. इंडियन एसेस ४ ३ १
२. फिलिपिन ५ ४ १
३. यूएई रॉयल्स ५ ३ २
४. सिंगापूर स्लॅमर्स ५ २ ३
५. जपान वॉरियर्स ५ ० ५