आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPTL: Kohli Becomes Co owner Of UAE Royals; Federer To Lead The Side

आयपीटीएल टेनिस : विराट काेहलीच्या टीममध्ये आता फेडररची सर्व्हिस!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - स्विसकिंग राॅजर फेडरर आता लवकरच भारतीय कसाेटी टीमचा कर्णधार विराट काेहलीच्या संघाकडून सर्व्हिस करताना दिसणार आहे. डिसेंबरमध्ये दुसर्‍या सत्राची आंतरराष्ट्रीय प्रीमियर टेनिस लीग (आयपीटीएल) हाेणार आहे. या आयपीटीएलमध्ये फेडरर हा विराट काेहलीच्या टीमचे प्रतिनिधित्व करणार आहे. काेहलीने नुकताच या लीगसाठी यूएई राॅयल्स टीमसाेबत सहमालक म्हणून करार केला आहे. त्यामुळे आता काेहलीची टीमही या लीगमध्ये खेळणार आहे. फुटबाॅलपाठाेपाठ आता विराट काेहलीने टेनिसमध्येही संघ खरेदी केला.

काेहलीच्या याच टीममध्ये जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेला राॅजर फेडररही सहभागी झालेला आहे. सचिनला आपला आदर्श मानणार्‍या काेहलीने आपल्या टीमसाठी फेडररसाेबत करार केला आहे.

‘राॅजर फेडररसाेबत जवळीक साधण्याची मी काेणतीही संधी दवडू शकत नाही. त्याच्या सहभागामुळे आमचा संघ मजबूत झाला आहे. त्यामुळे आमचे लीग जिंकण्यासाठीचे पारडे अधिक जड झाले आहे,’अशी प्रतिक्रिया सहमालक विराट काेहलीने दिली.

असा आहे यूएई राॅयल्स संघ
जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या राॅजर फेडररसह यूएई राॅयल्स संघात मरिन सिलिच, माजी नंबर वन अ‍ॅना इवानाेविक, माजी विम्बल्डन चॅम्पियन गाेरान इवानिसेविच, २०१४ च्या आॅस्ट्रेलियन आेपनमधील मिश्र दुहेरीचा विजेता क्रिस्टिना मलादेनाेविच, कॅनडाचा डॅनियल नेस्टर, चेक गणराज्यचा बर्डिच सहभागी झाले आहेत.

रवी शास्त्री टीमचे सल्लागार : रवी शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली काेहलीचा यूएई राॅयल्स संघ आयपीटीएलमध्ये खेळणार आहे. शास्त्री यांची सल्लागारपदी नियुक्ती झाली.

सचिनमुळे फेडररसाेबत कोहलीचा करार
टेनिस स्टार राॅजर फेडरर आणि भारताचा क्रिकेटपटू सचिन यांच्यात घनिष्ट मैत्री आहे. सचिन हा दरवर्षी विम्बल्डन टेनिस स्पर्धेदरम्यान राॅजर फेडररचा सामना पाहण्यासाठी उपस्थित राहताे. यातून सचिनने काेहलीच्या टीमशी फेडररचा करार करण्यासाठी मदत केल्याची चर्चा आहे.