आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅरालिम्पिकमध्ये इराणी सायकलपटूचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ - रिओ पॅरालिम्पिक रेसच्या वेळी टक्कर झाल्यानंतर इराणचा सायकलपटू सरफराज बहमान गोलबार्नेजाडचा मृत्यू झाला. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने (आयपीसी) दिलेल्या माहितीनुसार, ४८ वर्षीय बहमानला टक्कर झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. घटनास्थळी त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. नंतर त्याला रुग्णवाहिकेतून जवळचे रुग्णालय ‘युनिमेड रिओ हॉस्पिटल’मध्ये नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. बहमनने २०१२ लंडन पॅरालिम्पिकमध्येही सहभाग घेतला होता.

५६ वर्षांपूर्वी ऑलिम्पिकमध्ये सायकलपटूचा मृत्यू
आयपीसीने दिलेल्या माहितीनुसार पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासात स्पर्धा सुरू असताना एखाद्या खेळाडूचे निधन होण्याची ५६ वर्षांत अशी घटना पहिल्यांदा घडली आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये ५६ वर्षांपूर्वी एका खेळाडूचा स्पर्धा सुरू असताना मृत्यू झाला होता. १९८० मध्ये रोम ऑलिम्पिक सुरू असताना डेन्मार्कचा सायकलपटू कुनूड एनेमार्क जेनसेनचा १०० किलोमीटर टीम टाइम ट्रायलमध्ये मृत्यू झाला होता.
१९८० च्या युद्धात गमावला होता पाय
बहमनने बुधवारी सी-४ ट्रायलमध्ये १४ वे स्थान मिळवले होते. तो दुसऱ्या रेसमध्ये सहभागी झाला होता. त्याचा मित्र हाशेम रास्तेगारिमोबिनने दिलेल्या माहितीनुसार, बहमनने २००२ पासून सायकलिंगला सुरुवात केली. १९८० च्या युद्धात झालेल्या दुखापतीमुळे त्याला एक पाय गमवावा लागला. इराण पॅरालिम्पिक समितीने म्हटले की, ‘बहमन एक शानदार खेळाडू होता. तो पूर्ण ऊर्जेने देशासाठी खेळत असे. अखेरीस या खेळातच त्याने आपले प्राण गमावले.’
बातम्या आणखी आहेत...