आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोमण्याचा वैताग; अायर्नमॅन अाशिषने पूर्ण केली वर्ल्ड ओपन ट्रायथलॉन स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोरबा - ऑल वर्ल्ड आयर्नमॅन कोणताही भारतीय बनू शकणार नाही. कोणताच भारतीय यात सहभागी होऊ शकत नाही, असे टोमणे सात वर्षांपूर्वी त्याचे वर्गमित्र मारायचे. या टोमण्यांना वैतागून त्याने जवळपास ५ वर्षे मेहनत घेतली. ही कथा आहे छत्तीसगडच्या आशिष अग्रवालची. आशिषने ६ जून रेाजी ऑल वर्ल्ड ओपन आयर्नमॅन ट्रायथलॉन पूर्ण केली. यात सहभागी होणारा तो एकमेव भारतीय होता. आयर्नमॅन बनणारा आशिष सहावा भारतीय ठरला आहे.

बालकोनगरचा आशिष अग्रवाल एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी २००९ मध्ये फ्रान्सला गेला होता. तेथे इथिक बिझनेस स्कूलमध्ये त्याने शिक्षण घेतले. या काळात जलतरण आणि सायकलिंगमध्ये त्याची रुची वाढली. सरावाच्या वेळी त्याला आपल्या फ्रान्सच्या वर्गमित्रांच्या टोमण्यांचा सामना करावा लागत असे. त्याचे वर्गमित्र म्हणायचे, "हा बघा. हा भारतीय स्वत:ला आयर्नमॅन समजतो. एखादा भारतीय खरोखर आयर्नमॅन बनू शकेल काय? ते तर यात सहभागीसुद्धा होऊ शकत नाहीत.' आशिषला हे टोमणे बोचायचे. २०११ मध्ये एमबीएची पदवी घेतल्यानंतर तो भारतात परतला. येथे आल्यानंतर वडिलांच्या व्यवसायात त्याने मदत करण्यास सुरुवात केली. कुटुंबाने त्याला आयर्नमॅनची तयारी सुरू ठेवण्यासाठी प्रेरित केले. त्याने तयारी सुरू केली. सात वर्षांच्या तयारीनंतर त्याने फ्रान्समध्ये ऑल वर्ल्ड ओपन ट्रायथलॉनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. वर्ल्ड ट्रायथलॉन कॉर्पोरेशनकडून आयोजित या स्पर्धेत ६० देशांच्या ३ हजार खेळाडूंनी सहभाग घेतला. यात सहभागी होणारा आशिष एकमेव भारतीय होता. आयर्नमॅन बनणारा आशिष सहावा भारतीय ठरला. याआधी आनंद पाटील, पृथ्वीराज पाटील, अभिनेता मिलिंद सोमण, हिरेन पटेल, कौस्तुभ राडकर हे आयर्नमॅन बनले आहेत.
बातम्या आणखी आहेत...