आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणच्या युवांची प्री-क्वार्टर फायनलमध्ये मेक्सिकाेवर 2-1 ने मात; स्पेनकडून फ्रान्सचा पराभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फार्ताेडा/गुवाहाटी- अाशियाई टीम इराण अाणि युराेपियन स्पेन, इंग्लंड अाणि मालीच्या युवांनी फिफाच्या १७ वर्षांखालील फुटबाॅल वर्ल्डकपमध्ये उल्लेखनीय कामगिरीने  विजयाची नाेंद केली. या दाेन्ही युवांनी मंगळवारी अंतिम १६ च्या सामन्यात दाेन वेळच्या माजी विश्वविजेत्या मेक्सिकाे अाणि एक वेळच्या चॅम्पियन फ्रान्सचा धुव्वा उडवला. त्यामुळे या दाेन्ही बलाढ्य संघांचे स्पर्धेतील अाव्हान संपुष्टात अाले. सनसनाटी विजयाच्या बळावर इराण अाणि तीन वेळच्या उपविजेत्या स्पेनच्या युवांनी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील अापला प्रवेश निश्चित केला. मेक्सिकाेच्या युवांना यंदा किताबाचा प्रबळ दावेदार मानले जात हाेते. मात्र, त्यांना फार काळ अापले अाव्हान कायम ठेवता अाले नाही. त्यामुळे त्यांना झटपट गाशा गुंडाळावा लागला.   

इराणच्या युवांनी प्री-क्वार्टर फायनलमध्ये मेक्सिकाेवर धडाकेबाज विजयाची नाेंद केली. इराणच्या युवांनी २-१ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. माे. शरीफ (७ वा मि.) अाणि सय्यद (११ वा मि.) यांनी केेलेल्या प्रत्येकी एका गाेलच्या 
बळावर इराणच्या टीमने विजयश्री खेचून अाणली. दाेन वेळच्या चॅम्पियन मेक्सिकाेकडून राेसाने ३७ व्या मिनिटाला एकमेव गाेल केला.  त्यामुळे या टीमला पराभवाचा सामना करावा लागला.    

मेक्सिकाेची शर्थीची झुंज; गाेल  करून बराेबरीचा प्रयत्न व्यर्थ
 तिसऱ्यांदा विश्वविजेता हाेण्यासाठी उत्सुक असलेल्या मेक्सिकन युवांनी सामन्यात शर्थीची झंुज दिली. मात्र, त्यांना सामन्यात शेवटपर्यंत समाधानकारक खेळी करता अाला नाही. राेसाने मध्यंतरापूर्वी मेक्सिकाेकडून गाेलचे खाते उघडले. 

फ्रान्सचा १-२ ने झाला पराभव; स्पेनची अागेकूच 
२००९ च्या विश्वविजेत्या फ्रान्स अंतिम १६ च्या सामन्यात तीन वेळच्या उपविजेत्या स्पेनने पराभूत केले. स्पेनच्या युवांनी २-१ ने विजय मिळवला. मिरांडा (४४ वा मि.) व अबेल रुईझ (९० वा मि.) यांच्या  बळावर स्पेनने सामना जिंकला. 

पहिला शूटअाऊट सामना; इंग्लंडची जपानवर मात
इंग्लंडने  उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. इंग्लंडने मंगळवारी शूटअाऊटमध्ये ५-३ जपानचा पराभव केला. रिहान, कॅलेम हॅडसन, फिलिप, कार्टिस व किर्बीने इंग्लंडचा विजय निश्चित केला. निर्धारित वेळेपर्यंत हा सामना शून्य गाेलने बराेबरीत हाेता. 

मालीची इराकवर मात; ५-१ ने जिंकला सामना
गाेवा | मालीने  इराकचा पराभव केला. मालीने ५-१  ने सामना जिंकला. लसाना एडिअाए (३३, ९०+४ वा मि.), हादजी (२५ वा मि.) व कामराने(८७ वा मि.) मालीचा विजय निश्चित केला. अली करीमने (८५ वा मिनिट) इराकसाठी एकमेव गाेल केला. 

ब्राझील -हाेंडुरस अाज सामना रंगणार   
काेचीच्या मैदानावर बुधवारी तीन वेळचा विश्वविजेता ब्राझील अाणि हाेंडुरस यांच्यात अंतिम १६ चा सामना रंगणार अाहे. हा सामना जिंकून अंतिम अाठमधील प्रवेशासाठी दाेन्ही टीमचे युवा सज्ज अाहेत. त्यामुळे हा सामना राेमांचक हाेण्याची शक्यता अाहे. ब्राझीलचे युवा खेळाडू सलगच्या तीन विजयांनी  फाॅर्मात अाहे. त्यांनी  गटातील तिन्ही सामन्यांत  विजयाची नाेंद केली. 

अाता स्पेन-इराण झुंजणार 
प्री-क्वार्टर फायनलमध्ये सनसनाटी विजय संपादन करणाऱ्या इराण अाणि स्पेन यांच्यात उपांत्यपूर्व सामना रंगणार अाहे. हे दाेन्ही संघ अाता २२ अाॅक्टाेबर राेजी काेचीच्या मैदानावर समाेरासमाेर असतील.   
बातम्या आणखी आहेत...